गजराजाचा मृत्युने वनविभागात खळबळ The death of Gajraja caused excitement in the forest department




चंद्रपूर : मागील काही महीण्यापासून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीच्या कळपाने A herd of elephants in Gadchiroli Chandrapur district धुमाकूळ घातला होता ,त्यातीलच एका हत्तीने सिंदेवाही तालुक्यात धुमाकूळ घातला होता. मंगळवार ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी गजराजा मृतावस्थेत Gajaraja was dead मिळाल्याने वनविभागात खळबळ माजली आहे.


आसाम मधील हत्तींचा कळप छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत शेकडो घरांचे नुकसान केले होते.गडचिरोली जिल्ह्यातून ब्रम्हपुरी मार्गे नागभिड,सावली सिन्देंवाही तालुक्यात धुमाकूळ घातला होता .त्यातील एक हत्ती एकटा पडल्याने त्यां हत्तीनी पिकांचे अतोनात नुकसान केले.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन हत्तीचा मृत्यू तर झाला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.



सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र सिंदेवाही  येथील नियत क्षेत्र लोणखैरी कक्ष क्र.२४७ आर एफ मधील एका खाजगी शेतात मृताअवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे.घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हत्तींचा मृत्यू विज प्रवाहाच्या आघाताने झाल्याच्या अंदाजावरून अशोक पांडूरंग बोरकर वय ५६ रा.चिटकी व अजय अशोक बोरकर वय २९ या चिटकीयांचे विरूद्ध पिओआर.क्र ०९१३०/२२८२३१ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आले आहे. चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले असून त्याची एम बी चोपडे सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजिव) ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी हे सखोल चौकशी करीत आहेत.