सकमुरातील तिस रुग्णांना हलविले;कोरोनाचा संकटात गावात तापाची साथ ; सकमुरात आरोग्य विभागाची टिम



गोंडपिपरी

महीण्याभरापासून तापाने फणफणत असणाऱ्या सकमुर गावात आज आरोग्य विभागाची टिम दाखल झाली. मात्र त्या आधीच खाजगी वाहन,रुग्णवाहीकेने जवळपास तिस रुग्णांना गोंडपिपरी,चंद्रपूरात हलविण्यात आले आहे. गावातील अनेक डबक्यात,घराही साठवून ठेवलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास आढळून आल्याची माहीती तालूका वैद्यकीय अधिकारी गोंडपिपरी यांनी दिली.


गोंडपिपरी तालूक्यातील सकमुर येथे तापाची साथ पसरली आहे.प्रत्येकच घरात तापाचे रुग्ण फणफणत आहेत. बहूतांश रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत आहेत. शाशकीय रुग्णालयातही रुग्ण गर्दी दिसत आहे.  साधारणता महीण्याभरापासून सकमुर गावात तापाची साथ आहे. दूसरीकडे कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागु आहे. नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले आहे.दूसरीकडे पेट्रोल,डिजेल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दूचाकी,चारचाकी वाहने उभी आहेत.अश्या बिकट स्थितीत सकमुर येथिल रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात मोठ्याच अडचणी येत आहे. दरम्यान आज आरोग्य विभागाचा चमूने सकमुर गावाला भेट दिली.अनेकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. आरोग्य विभागाचा चमुने गावात पाहणी केली असता गावात अनेक ठिकाणी सांडपाणी साचून होते.दूसरीकडे नागरिकांनी साठवणूक करुन ठेवलेल्या  पाण्यात डेंग्यू,मलेरीयाचे जतू आढळले आहेत.दरम्यान नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आव्हान तालूका वैद्यकीय अधिकारी डाॕ.चकोले यांनी केले आहे.

ओपीटीत दोनच रुग्ण..

आरोग्य विभागाचा चमुने केलेल्या तपासणीत केवळ दोनच तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाची चमू गावात दाखल होई पर्यंत खाजगी वाहनाने,खाजगी रुग्णवाहीकेने अनेकांना उपचारासाठी ईतरत्र हलविण्यात आले आहे.