गोंडपिपरी
दिवसभर मिळेल ते काम करायच अनं मिळालेल्या रोजीतून घरची चुल पेटवायची. दोन घासाचा आधार घेत पुन्हा उदयाच्या कामाच्या विचारात झोपी जायच.गावखेडयातील मजुर,कामगारांची हि दैनंदिनी सध्या कोरोनाने विस्कळीत काढली.लाकडाउनने शेतातील काम थंाबली.अनं या मजुरांची रोजीरोटीही हिरावली.पण कालचा दिवस त्यांच्यासाठी आशेचा ठरला कारण त्या मजूर महिला कामाला लागल्या.म्हणाल्या सवाल पोटाचा आहे साहेब काम तर करावच लागेल.
ग्रामीण भागात शेतातील मजूरीशिवाय दुसर फारस काम नसत.अशात धानकापणी,रोवणी,कापूसवेचणी हि कामे करून महिला आपल्या संसाराला हातभार लावतात.सध्या मिरचीतोडीचा हंगाम होता.राज्यातील हजारो मजूर तेलंगणात मिरची तोडायला गेले.पण आपल्या घरी राहून गावातच काम करणा-या मजूर महिलाही आहेत.मिरचीतोडणीचे काम सुरू असतांनाचा कोरोनाने दस्तक दिली.शासनाने लाॅकडाउन केला.अनं गेंल्या आठ दिवसापासून त्यांचा रोजगार हिरावला.अशात सकमूर परिसरात भारत रेडडी नावाच्या शेतक-यांच्या नउ एकर शेतात मिरचीतोडणीच काम सुरू झालं.अन महिलंाच्या आंनदाला पारावार उरला नाही.रोज काम करून त्या पैशातून आपल कुटंुब चालविणा-या महिलंांच्या गेल्या आठ दिवसात खस्ता हालत झाली होती.
आधीच कोरोना व्हासरसचा धुमाकुळ.या व्हायरसची भिती गावख्ेाडयातही पसरलेली.कारण पुणे,मुंबई व इतर शहरात काम करणारे सुरक्षेच्या दृष्टीने गावाकडे परतलेत.अशावेळी शेतात मिरची तोडणीचे काम सुरू करतांना मजूर महिला तोंडाला रूमाल झाकून किमान अंतर ठेउन काम करित आहेत.कोरोनाची भिती आहे.पण प्रश्न पोटाला आहे.काम केल नाही तर चुल पेटणार नाहीच याची जाणीव असल्यानं या श्ेातकरी महिलांनी साहेब सवाल पोटाचा आहे काम तर करावच लागेल अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक भान
कोरोनाच व्हायरस चा प्रादुर्भाव होउ नये याचे भान ठेवीत या मजूर महिला चांगली काळजी घेत आहेत.तोडावंर रूमालीने झाकून त्या मिरचीतोडीचे काम करीत आहेत.हे काम करित असतांना किमान अंतर राहिल याचीही काळजी घेत त्यांनी सोशल डिस्टंन्सचा परिचय देत विनाकारण समुहाने फिरणा-यांना चांगली चपराक लगावली आहे.