टाटा ट्रस्ट कडून जिल्ह्यासाठी
2 हजार 500 लिटर सॅनीटायझर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहे. टाटा रॅलीझ आणि टाटा केमिकल्सच्या वतीने टाटा ट्रस्ट कडून जिल्ह्याला 2 हजार 500 लिटर सॅनीटायझर उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या टप्यात 2 हजार लिटर सॅनीटायझर जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले असुन दुसऱ्या टप्यात उर्वरीत 500 लिटर लवकरच देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, टाटा ट्रस्टच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामधील जिल्हा समन्वयक रियाज मुलानी, प्रणव वाकडे, जिल्हा व्यवस्थापक सुमित पांडे,सूरज साळुंके व टाटा ट्रस्टचे इतर कर्मचारी उपस्थित होते.