पित्याने पुत्रावर गोळीबार करून स्वत: केली आत्महत्या
बल्लारपूर येथे मूलचण्द द्विवेदी यांनी घरातील आपसी वादात स्वतःच्या आपल्या दोन मुलांना गोळ्या झाडून व स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधे आकाश द्विवेदी ह्या मुलाच्या ह्रुदयात गोळी मारल्याने तो जागीच ठार झाला तर पवन द्विवेदी ह्या मुलाच्या हाताला व छातीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी असून त्याचा डॉ. पौद्दार यांच्या हॉस्पिटल मधे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील हॉस्पिटल ला पुढील उपचारांकरिता नेण्यात आले आहे.
ही घटना बल्लारपूर येथील कॉलरी परिसरातील दुपारी साडेचार वाजता ची असून म्रूतक आकाश हा २५ वर्षाचा आहे तर गंभीर जखमी असलेला पवन १९ वर्षाचा आहे . ह्या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस करीत असून स्वतःच्या मुलांवर गोळ्या झाडण्या मागे काय कारण आहे ?हे अजून स्पष्ट झालेले नाही ..