महाराष्ट्र दिनाचा झेंडावंदन पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातच
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले आहेत. उद्या 1 मे रोजी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री यांच्यासह मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडल्या जाणार आहे.
शासनाच्या एका परिपत्रकानुसार राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. या ठिकाणी केवळ पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद इतकेच पदाधिकारी,अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. कवायतीचे आयोजन करण्यात येऊ नये.विधिमंडळ मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधेपणाने संपन्न होईल.