खासदार बाळू धानोरकर यांच्या पुढाकारातून लोकसभा क्षेत्रात तीन हजार गरजूना भोजन
चंद्रपूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरजूना उपाशीपोटी दिवस कडवे लागू नये म्हणून लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कालपासून लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,वणी, घाटंजी येथील तीन गरजूना भोजन वितरित करण्यात आले.
नागरिकांनी लॉकडाऊनला गंभीरतेचे सहकार्य न केल्यास लॉकडाऊन कालावधी वाढवावा लागू शकतो. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हि बाब आपल्या देशासाठी व महाराष्ट राज्यातील चिंतेची बाब आहे. देशातील कोरोनाग्रस्थांची संख्या वाढतच आहे. या मध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरिबांची उपासमार होता कामा नये, यासाठी लोकसभा क्षेत्रातील तीन हजार गरजूना भोजनाची व्यवस्था खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
आज खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी देखील स्वतः गरजूना भोजन वितरित केले. त्याच प्रमाणे इतरही ठिकाणी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भोजन वितरित केले. कोणीही गरजू भुकेल्या पोटी झोपता काम नये याची काडजी घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
--