जिल्ह्यातील ४१निवारागृहापैकी २२निवारागृहात६६७ नागरीक आश्रयाला
महाकाली मंदिर चंद्रपूर येथे 27 नागरिक आश्रयाला आहेत याची क्षमता 200 नागरिकांची आहे. बेघर निवारा गंजवार्ड चंद्रपूर या निवारागृहामध्ये एकूण 8नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 65 नागरिकांची आहे. रामचंद्र नगर हिंदी शाळा जटपुरा येथे एकूण 14 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 25 नागरिकांची आहे. सरदार पटेल प्राथमिक शाळा जटपुरा येथे एकूण 34 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 35नागरिकांची आहे. महांकाली कन्या शाळा महांकाली चंद्रपूर येथे एकूण 4 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 25 नागरिकांची आहे. पोलीस कन्वेंशन हॉल चंद्रपूर येथे हे 134 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 150 नागरिकांची आहे. महेश भवन तुकूम येथे 37 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 50 नागरिकांची आहे.
बल्लारपूर तालुक्यामधील रैनबसेरा नगर परिषद बचत भवन येथे एकूण 26 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 75 नागरिकांची आहे.
राजुरा तालुक्यामधील झाकीर हुसेन प्राथमिक शाळा येथे एकूण 21 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 22 नागरिकांची आहे. सम्राट अशोक हायस्कूल लक्कडकोट येथे एकूण 48 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 60 नागरिकांची आहे. शिवाजी महाविद्यालय येथे एकूण 119 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 125 नागरिकांची आहे.
कोरपना तालुक्यामधील रैनबसेरा निवारागृह नगरपंचायत येथे एकूण 4 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 50 इतकी आहे.
मूल तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव येथे एकूण 12 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 16 नागरिकांची आहे.
सावली तालुक्यांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 21 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 80 नागरिकांची आहे.
चिमूर तालुक्यामधील केनेल वसाहत जवारबोडी येथे एकूण 7 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 15 नागरिकांची आहे. जिल्हा परिषद शाळा उसेगाव येथे 3नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 15 नागरिकांची आहे. ग्रामपंचायत खांबाळा येथे 12 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 15 इतकी आहे. ग्रामपंचायत आसोला येथे एकूण 9 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 12 इतकी आहे.
वरोरा तालुक्यामधील भारत भूषण मालवीय विद्यालय येथे 36 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 55 नागरिकांची आहे. इंदिरा गांधी प्राथमिक शाळा येथे एकूण 31 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 78 इतकी आहे.
भद्रावती तालुक्यामधील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे एकूण 60 नागरिक आश्रयाला असून याची क्षमता 125 नागरिकांची आहे.
हे आहेत राखीव निवारागृह :
चंद्रपूर तालुक्यामधील लोकमान्य टिळक कन्या प्रायमरी स्कूल पठाणपुरा, कर्मवीर कन्नमवार शाळा शास्त्रीनगर, भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर शाळा आंबेडकर नगर, सरदार पटेल कन्याशाळा नगीना बाग, जिल्हा परिषद शाळा घुग्गुस, जिल्हा परिषद शाळा पडोली येथे आतापर्यंत एकही नागरिक आश्रयाला नसून यांची क्षमता 155 नागरिकांची आहे.
कोरपना तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळा गडचांदूर, जिवती तालुक्यांमधील विदर्भ कॉलेज, गोंडपिपरी तालुक्यामधील जिल्हा परिषद मुलींची शाळा, पोंभुर्णा तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळा, मूल तालुक्यामधील किसान भवन कृषी उत्पन्न बाजार समिती व नवभारत विद्यालय मुल येथे आतापर्यंत एकही नागरिक आश्रयाला नसून यांची क्षमता 275 नागरिकांची आहे.
नागभीड तालुक्यामधील जनता विद्यालय व जिल्हा परिषद शाळा तलोठी, ब्रह्मपुरी तालुक्यामधील राजीव गांधी भवन, चिमूर तालुक्यामधील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह, सिंदेवाही तालुक्यांमधील पंचायत समिती सभागृह,जिल्हा परिषद शाळा सिंदेवाही,जिल्हा परिषद शाळा लोनवाही व लोकसेवा विद्यालय गर्ल्स हॉस्टेल नवरगाव येथे आतापर्यंत एकही नागरिक आश्रयाला नसून यांची क्षमता 400 नागरिकांची आहे