खुद्दार मेरे शहर में फाक़े से मर गया, राशन तो मिल रहा था पर, वो फोटो से डर गया

खुद्दार मेरे शहर में फाक़े से मर गया,
राशन तो मिल रहा था पर,
वो फोटो से डर गया

खाना थमा रहे थे लोग सेल्फी के साथ
मरना था जिसको भूख से,
वो ग़ैरत से मर गया !


कुण्या अज्ञात शायराने वरील ओळी बहुतेक आजच्या परिस्थितीला पाहूनच लिहिलेले असेल. सध्या सोशल मीडिया (फेसबुक-व्हाट्सअप) वर कुणीतरी कुणाला काहीतरी देतानाचे अनेक फोटो बघायला मिळतात. आज आलेली स्थिती बघता असे फोटो व्हायरल होणे गरजेचे नाही. "उजव्या हाताने केलेले दान, डाव्या हाताला ही माहिती न होणे" ही आपली संस्कृती आहे. आज याच संस्कृतीचा समाजकंटकांना विसर पडत आहे, असे वाटायला लागले आहे.

नुकतेच चंद्रपूर जिल्हा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांचेवर याचसंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप पाझारे यांनी केला आहे. गरजवंतांना त्याची गरज पूर्ती करताना कशाला हवा फोटो? हा मात्र विचार करण्याजोगा प्रश्र्न आहे. असे अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. अनेक फोटोही सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळत आहेत. शासनाने यासाठी दिशानिर्देश ही दिले आहेत. रेकॉर्ड सांभाळायचा असेल तर फोटो आवश्यक आहे परंतु त्याची प्रसिद्धी कशाला हवी हा पण तेवढाच विचार करण्याचा विषय आहे. प्रसिद्धीची कोणती हाव नसणारे अनेक दानशूर आज या बिकट समयी आपापल्यापरीने सेवा देत आहेत. आज लखपत्यांपासून तर अरबपतींपर्यंत चे धनदांडगे lock झाले आहेत तर down समजला जाणारा गरीब व्यक्ती आपल्या दारासमोर येऊन रोज आपला कुडा-कचरा उचलून कर्तव्य बजावित आहे. या व्हायरस ने साऱ्यांनाच त्याचे कर्तव्य-धर्म यांची जाणीव करून दिली आहे. Lockdown च्या काळात प्रत्येकाने फक्त शेजारधर्म भी निभावला तरी कोणीही उपाशी राहणार नाही यात दुमत नाही.

आजच्या परिस्थितीचा आपण विचार करू या. पती-पत्नी व दोन मुले असे छोटे कुटुंब असणारा परिवार खाजगी क्षेत्रात कार्यरत पतीच्या कमाईवर दोन वेळेसचे सुखाने पोट भरत आहे. अशावेळी आलेल्या या संकटामध्ये एका महिन्याचे राशन त्यांनी घरी भरून ठेवले आहे परंतु कमवता पुरुष आज lockdown मध्ये घरी आहे. अन्नधान्य रेशन दुकानातून मिळत आहे, जवळ असलेली तुटपुंजी रक्कम आता पुर्ण खर्च होण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा त्याला कूटूंबासाठी लागणार्या जीवनावश्यक समजल्या जाणाऱ्या तेल, तिखट, मीठ, साखर, पत्ती, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. शेजाऱ्यांनी फक्त माझा शेजारी कोणत्या अडचणीत आहे, हे समजून शेजारधर्म ही निभावला तरी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला आटोक्यात आणण्यात देशाला अवधी लागणार नाही आणि हे फक्त आपल्याच देशात होऊ शकते, याची जाणीव या देशातील सगळ्याच देशबांधवांना आहे. पैसा किती गरजेचा व महत्वाचा आहे, हे आजच्या परिस्थितीने साऱ्यांना शिकवले आहे. दान कसे करावे याचे उदाहरण भारताचे दानशूर उद्योगपती रतनजी टाटा, अजीज प्रेमजी सारख्या उद्योगपतींनी दाखवून दिले आहे. सेवा कशी करावी हे आरोग्य विभागातील सेवकांनी दाखविले तर कर्तव्य कसे बजवायचे हे आज पोलीस विभागाने शिकविले आहे. आधुनिकता, सुसंपन्नता, श्रीमंती हे जिवंत राहिल्यानंतर कामी येते.

आजच्या उद्भवलेल्या स्थितीवर गोर-गरिबांचे हाल झालेले आहेत. शासन प्रशासनातर्फे यावर उपाय योजना केल्या जात असून काही समाजसेवी मंडळी, पुढारी मंडळी, समाजसेवी संस्था, सामाजिक संघटना, दानशुर व्यक्ती आपापल्या परीने कोणी उपाशी राहू नये यासाठी समोर आले आहेत. घरचा कर्ता पुरुष lockdown चे पालन करत घरी बसला आहे. याची झळ सर्वसामान्यांपासून तर खालच्या शेवटच्या वर्गापर्यंत सर्वांनाच बसली आहे. यावर उपाय म्हणून भोजनदान, अन्नधान्य वितरण अशा पद्धतीने अनेक जण समाजसेवा करीत आहे. परंतु या समाजसेवेच्या नावावर काहींनी फोटोसेशन च्या घृणित कार्यातून समाजसेवेचा काळीमा फासत आहे, असे अनेक उदाहरणे आज राज्यात देशात समोर येत आहे. यावर बंधन असावे यासाठी आव्हाने करण्यात येत आहेत. परंतु फोटोची भुकेले प्रसिद्धीची हाव असणारे काही सुधारायला तयार नाहीत. गरीबीची थट्टा व गरीबाची मजाक आपण करत आहोत याचे भान सुद्धा यावेळी या गैरतमंदाना होत नाही, ही शोकांतिका आहे. संपूर्ण जगावर आलेले हे अविस्मरणीय संकट आहे. भारत देश सुद्धा या संकटाच्या सामना करीत आहे. येथील नागरिक शासनाच्या मिळालेल्या आदेशाला मानून आपापल्या घरी बसला आहे. परंतु आपले कुटुंब मुलं-बाळं यांच्या एक वेळच्या अन्नासाठी बाहेर निघून कष्ट करणारा मोठा वर्ग ही यात आहे. याच वर्गाच्या हाल-अपेष्टा होऊ नये यासाठी अन्नधान्य वितरण यासारखे कार्यक्रम राबविले जात आहे. आजच आणि हा संपलेला विषय नाही येणाऱ्या काही वर्षापर्यंत याची झळ सार्‍यांनाच बसणार आहे, संयम ठेवून, दानशूरपणा अंगी बाळगून, शेजार धर्माचे पालन करून या समस्या सर्वांनाच लढायचे आहे आणि जिंकायचे आहे.