पं.स.सावलीचे सभापतीसह 33 रक्तदात्यानी केले रक्तदान
सावली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण वाढत आहे त्यामुळे या संकट काळात रुग्णांनासुद्धा मदत व्हावी या उद्देशाने तुकडोजी महाराज जयंतीचे निमित्ताने पंचायत समिती सावली येथे रक्तदान शिबिर पार पडले.
कोरोना संकटकाळात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केल्या जात आहेत. सावली पंचायत समिती तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाकरीता जिल्हा सामान्य रुग्नालय गडचिरोली येथील राज्य रक्त संक्रमन परिषद महाराष्ट्र राज्य चमुच्या सहकार्य लाभले. पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्याहसह गटविकास अधिकारी अमोल भोसले, उपसभापती रविंद्र बोलीवार यांसह अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व नागरिकांनी रक्तदान केले.