सनसनी खेज :- पैनगंगा खाणीतून घुग्घूस सायडींगवर चोरीचा कोळसा? लाॅकडाऊन मध्येही कोळसा चोरी जोमात?
*तब्बल २३ दिवसांनंतर घूग्गूस पोलिसात तक्रार दाखल, *पैनगंगा कोळसा खाणीचे महाप्रबंधक घूग्गूस हद्दीतील पोलिस स्टेशन मधे कसे काय तक्रार देतात ? *घूग्गूस सबएरिया मैनेजर व कोळसा सायडिंग इन्चार्ज गोत्यात? *वेकोलि अधिकारी, कोळसा माफिया आणि पोलिस प्रशासन यांच्यासोबतच काही पत्रकार यांचाही समावेश असल्याची चर्चा !
कोळसा चोरी भाग – १
चंद्रपूर जिल्ह्यात बेकायदेशीर कोळसा टाल हे कोळसा माफियांनी कोळसा चोरीचे अड्डे बनविले असून वेकोलि अधिकारी, पोलिस आणि कोळसा माफियांच्या संयुक्त प्लान मधून कोळसा चोरीचे हे सत्र सतत सुरू आहे. अगोदरच कैलास अग्रवाल या कोळसा माफियांसोबतच आणखी दोन लोकांवर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे सबसिडीच्या कोळसा चोरी संदर्भात गुन्हे दाखल आहे. मात्र आता लॉकडाऊन चा गैरफायदा उचलून कोळसा माफिया, वेकोली अधिकारी व पोलिस यांचा कोळसा चोरीचा प्लान दस्तुरखुद्द पैनगंगा वेकोलि महाप्रबंधक अजय सिंह यांनीच उघड केल्याने आता या प्लान मधील सगळ्यांची घाबरगुंडी उडाली आहे. मागील महिन्याच्या जवळपास १४ तारखेला तीन ट्रक हे घूग्गूस कोळसा सायडिंग वर येतात तिथे कोळसा खाली न करता कोळसा खाली झाल्याची रिटर्न परची घेतात व त्या गाड्या नागाडा मधील एक बेकायदेशीर कोळसा टालवर खाली होतात व ह्या गाड्या दुसऱ्या दिवशी पैनगंगा कोळसा प्रकल्पात जातात तरीही कुणाला खबर नसते, मात्र तब्बल २३ दिवसांनंतर हे प्रकरण समोर येते आणि घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तीन ट्रक चालकावर गुन्हे दाखल होते. पण पैनगंगा कोळसा खान ही गडचांदूर पोलिस स्टेशन हद्दीत येते आणि घूग्गूस कोळसा सायडिंगवर आलेल्या कोळशाची जबाबदारी ही घूग्गूस सब एरिया व कोळसा सायडिंग इन्चार्ज यांची असतांना पैनगंगा मधील महाप्रबंधक यांना घूग्गूस मधे तक्रार देण्याची गरज काय ? असे प्रश्न निर्माण होऊन सुद्धा मुख्य महाप्रबंधक गप्प कां ? हा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे. या प्रकरणी आणखी एका वरिष्ठ पत्रकार समूहाची मुख्य भूमिका असून त्यांच्या सहभागाने दररोज पाच ते आठ ट्रक कोळसा घूग्गूस सायडिंग वरून गायब केला जात असल्याची गंभीर बाब चर्चेत असल्याने वेकोलिची लॉक डाऊन मधे सुद्धा कोळसा चोरी होते कशी ? मग दोन चाकी वाहनांना पोलिस रस्त्यावर फिरू देत नसतांना दहा ते सोळा चक्का ट्रक कोळशाच्या गाड्या कशा काय बेकायदेशीर कोळसा टालवर जावू दिल्या जाते ? याची चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात जे जे लोकं सामील आहे त्यांची पूर्ण डीटेल येणाऱ्या काळात समोर जाहीर होणार अशी शक्यता आहे.