नसलेल्या राजकीय पदाचा नाजायज वशिला लावणार्या घुग्गूस कोळसा चोरी प्रकरणातील "त्या"आरोपींच्या पोलिस आवळणार मुसक्या?
चंद्रपुर : लाकडाऊन मध्ये सगळे व्यवहार ठप्प होते व जिवनावश्यक वाहनांव्यतिरिक्त संपुर्ण वाहतुक बंद ठेवण्याचे निर्देश असतांना ही पडोली,नागाळा येथील कोळसा टालावर चोरीच्या कोळशाचे ट्रक रिकामे होतांना बघण्यात आले आहे. खाणीतून हा कोळसा कसा काढण्यात आला व तो वाहतुक करून पडोलीपर्यंत कसा पोहोचला हा गहन तपासाचा विषय आहे. खळबळजनक वृत्त असे आहे की, मार्च महिन्यात संपूर्ण lock down मध्ये ही पैनगंगा कोळसा खाणीतून निघालेले कोळसा ट्रक हे घूग्गूस कोळसा सायडिंग वर खाली न होता ते सरळ नागाडा येथील कोळसा टालावर खाली झाल्याने पैनगंगा कोळसा प्रकल्पाचे महाप्रबंधक अजय सिंह यांनी घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तीन ट्रक चालक गौरीशंकर वाढई, तलाश तिरसोडे, व उमेश येडामे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागाडा येथील ज्या टालावर हा कोळसा रिकामा करण्यात आला, त्या कोळसा टाल मालकाची आता स्वत:ला बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू असून राजकीय वशिल्याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय पक्षांच्या नावावर दलाली करणारा या कोल माफियावर आता कायद्याचा बडगा उगारला जाणार की त्याठिकाणी पोळी शिजते याकडे मिडीया आपल्या तिसरा डोळातून नजर ठेवून आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाला आमच्या काही माध्यमाने प्रकरण उघडकीस आणले होते.मागील काही महिन्यांपासून कोळसा माफियांचा कोळसा चोरी करण्याचा सुळसुळाट चालला आहे.फेब्रुवारी महीण्यात कैलास अग्रवाल यांच्या नागाडा स्थित कोळसा साईडींग वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून २७ ट्रक ताब्यात घेतले होते.त्यानुसार कैलास अग्रवाल सह अन्यवर गुन्हा दाखल केला. कैलास अग्रवाल व अन्य ना न्यायालयाने जामिन मंजुर केला असला तरी कोळश्याच्या व्यवहारात लवकरचं मोठा पर्दाफाश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पैस्याच्या बळावर कोळसा चोरीच्या आळाचा गुन्हा लपविला मात्र पुन्हा काही दिवसांतच कोळसा तस्करीचा धंदा त्यांच्या टालावर पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा कोळस्याची तस्करी करणे सूरू केले. इतकेच नव्हे तर त्याच कोळसा चोरांनी लाॅकडाऊनच्या काळात सर्रासपणे कोळसा चोरण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु ठेवला. नागाडा व पडोली स्थित असलेल्या कोळसा टालवर कैलास, आशीष यांचेच वर्चस्व राहीले आहे. वेकोलीतून निघणारा कोळसा लघू व मध्यम उद्योगांना देण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र वेकोलीतून निघणारा कोळसा या उद्योगा़ंना न जाता ते सरळ कोळसा तस्करांच्या टालावर खाली करण्यात येत असल्याचे यासंदर्भात यापूर्वी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. नुकताच ३१ मार्च २०२० रोजी लाॅकडाऊनच्या काळात महाकाली काॅलरी व दुर्गापूर रय्यतवारी काॅलरी या वेकोलीतील कोळस्याचे डिओ गुजरात कोल अॅड कोक या काठीयावाड नावाने निघाला होता.मात्र तो कोळसा पडोलीस्थित आशिषच्या टालवर खाली करण्यात आले. ते ट्रक खाली करण्यासाठी आशीषला तारेवरची कसरत करावी लागली. तारेवरची कसरत करीत त्यांनी कोळस्याने भरलेले ट्रक नागपूर रोडवरील जयराज धाब्याजवळ चार ट्रक लपवून ठेवले आणि दि.२एप्रीलला अंधाराचा फायदा घेत पडोली स्थित कोळसा टालवर खाली केले.या कालावधीत एकुण ३० च्या जवळ कोळसा ट्रक खाली करण्यात आले. या वृत्ताला अवधी मिळत नाही तोच पुन्हा कोळसा चोरीचे मोठे घबाड उघडकीस आले आहे. या प्रकरणात जुन्या कोळसा चोरांचा ही सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि अधिकारी यांच्या सहमती शिवाय मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी कधीच होऊ शकत नाही असे दस्तुरखुद्द वेकोलि कर्मचारी यांचे म्हणने आहे. आणि घूग्गूस वेकोलि सायडिंग वरून ज्या तीन ट्रक गाड्या खाली न होता त्या नागाडा कोळसा टालवर ऊतरविल्या गेल्या त्यामागे सुद्धा वरिष्ठ वेकोलि अधिकाऱ्यांचा आशीर्वाद होता पण या प्रकरणाची वाच्यता सार्वजनिक झाल्याने या कोळसा चोरीची तक्रार पोलिसात द्यावी लागल्याचे आता समोर येत आहे.
खरं तर अनधिकृतपणे चालणाऱ्या पडोली व नागाडा येथील कोळसा टालवर वेकोलि मधील चोरीचा कोळसा इथे खाली होतो हे आता शीद्ध झाले असून मग तो कोळसा वेकोलितून सरळ चोरून आणलेला कोळसा असो की सबसिडीच्या नावाखाली कोळसा चोरी केलेला कोळसा असो, तो सर्व कोळसा हा याच बेकायदेशीर चालणाऱ्या कोळसा टाल वर उतरतो. पण जेंव्हा जेंव्हा पोलिस कारवाई होते तेंव्हा कोळसा टाल मालक मात्र यातून अलगद बाहेर येतो व त्यांचेवर गुन्हे दाखल होतं नाही, ही सत्य परीस्थिती आहे.या प्रकऱणात वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाच्या कोळसा घोटाळ्याची चौकशी करून घूग्गूस येथील कोळसा सायडिंग चा (काटा अधिकारी) लिपिक आणि सुरक्षा रक्षक यांचेवर कारवाई करावी अशी विविध स्तरातून मागणी होत आहे. त्या बातमीची सत्यता आता समोर आली असून घूग्गूस येथील कोळसा सायडिंग वर कार्यरत दोन सुरक्षा रक्षक स्वामी कन्कुटला व सतीश वांद्रे यांना वेकोली प्रशासनाने निलंबित केले असल्याने आता तो सायडिंग वर ट्रक खाली झाल्याची पावती देणारा लिपिक मोकाट कसा ? हा प्रश्न समोर येत आहे. कारण कोळसा सायडिंगवर खाली झाला नसतांना तो खाली झाल्याची पावती लिपिक देतो म्हणजे ह्या कोळसा चोरीत लिपिक तेवढाच दोषी आहे.
आता हे कोळसा चोरी प्रकरण घूग्गूस पोलिस स्टेशन मधून गडचांदूर पोलिस स्टेशन मधे स्थलांतरित करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे, त्यामुळे आता ज्या नागाडा कोळसा टाल मालक, सब एरिया मैनेजर, सायडिंग वाले लिपिक आणि स्वतः मुख्य महाप्रबंधक यांची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास कोट्यावधीचा कोळसा घोटाळा बाहेर येवू शकतो. कारण विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका महिन्या अगोदर अशाच कोळसा ट्रक गाड्या वणीच्या कोळसा टालवर ऊतरविल्या गेल्याचे बोलल्या जात असून त्या प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल न करता ते प्रकरण दडपल्या जात असल्याची सुद्धा माहिती हाती आली आहे. घुग्गुस कोळसा चोरी प्रकरणातील सुत्रधारांवर नसलेल्या राजकीय पदाचा नाजायज वापर केल्या जात असून त्याच्या पक्षातील नेत्यांनी याकडे लक्ष घालून पक्षाला स्वच्छ करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.लाॅकडाऊनमध्ये कैलाश आणि आशिष यांच्या टालवरील कोळसा ईतरत्र नेत असतांना ड्रायवर व क्लीनर यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.हे ट्रकधारक तेलंगणा,आध्रा,मध्यप्रदेश,छत्तीसगड, गुजरात येथे कोळस्याचे वाहतुक करत आहेत.मात्र त्यांच्यांवर तपासणी करण्यासाठी कुठलीही आरोग्य यंत्रणा समोर आलेली नाही.चंद्रपूर जिल्हा हा कोरोनाचे एकही रूग्ण नसल्याने ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.