गावी परतलेल्या मिरची तोड मजुरांना प्रवास खर्च द्या:-अॅड.गोस्वामी



चंद्रपूर : गेल्या काही दिवसात चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही, ब्रम्हपूरी, सावली, नागभीड, चिमूर, मूल यासह अनेक तालुक्यातील मजूर आपल्या स्वखर्चाने गावी दाखल झालेत. या स्थलांतरित मिरचीतोड मजुरांना शासनाने परतीचा प्रवास खर्च देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या माार्फतीने मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे १२ हजार मजूर मिरची तोड करण्यासाठी तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश राज्यात मार्च महिन्यात गेले होते. लॉकडाऊनमुळे या सर्वांना परत येता आले नाही. तेथे त्यांची प्रचंड गैरसोय झाली, अन्न व निवाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला. केंद्र व राज्य शासनाने परराज्यात अडकलेल्या मजुरांना स्वगृही जाण्याची परवाणगी देताच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात अडकून असलेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील हजारो मिरची तोडणारे कामगार मिळेल त्या वाहनाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या स्वखर्चाने स्वगृही परतले.

गेल्या काही दिवसात चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही, ब्रम्हपूरी, सावली, नागभीड, चिमूर, मूल यासह अनेक तालुक्यातील मजूर गावी दाखल झाले असून, सध्या कोरन्टाईनमध्ये आहेत.
शासनाने या मजुरांच्या परतीची कोणतीही सोय न केल्याने प्रति व्यक्ती सरासरी दीड हजार रुपयांचा प्रवास खर्च आला. हे सर्व मजूर अल्पभुधारक शेतकरी, शेतमजूर आहेत. गरीब मजुरांसाठी हा खर्च परवडणारा नाही. या प्रवास खर्चाचा परतावा शासनाकडून देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मौजा पाथरी व मौजा पेंढरी (दोन्ही गावे ता. सावली, जिल्हा- चंद्रपूर) येथील मजुरांनीी अॅङ पारोमिता गोस्वामी यांना दिले. याशिवाय त्यांनी आपली कैफियतही मांङली. हीच स्थिती संपूर्ण मजुरांची असल्यामुळे सर्व मिर्ची तोडणारे मजूर जे स्व-खर्चाने चंद्रपूर जिल्ह्यात परतले आहेत अशा सर्वांना त्यांचे परतीचा खर्च म्हणून ₹१५०० मिळावा, यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन मजुरांना दिलासा द्यावा, ही विनंती अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.