चंद्रपुरातील हाय प्रोफाईल भरवस्तीत बंदी असलेल्या सुगंधी तंबाखुच्या गोडाऊनमध्ये अन्य विषारी तंबाखूची भेसळ करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खुलेआम मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे. चंद्रपुरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या व्यापार्यावर कडक कारवाई करावी व त्याला चांगले "लाल" करावे अशी मागणी होऊ लागली आहे.
चंद्रपूर : चंद्रपुरातील हाय प्रोफाईल भरवस्तीत बंदी असलेल्या सुगंधी तंबाखुच्या गोडाऊनमध्ये अन्य विषारी तंबाखूची भेसळ करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खुलेआम मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे. मागील अनेक वर्षापासून या व्यापाराचे जिल्ह्यामधील हितसंबंध बघता त्याच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. संचारबंदी नंतरही लोकांनी नियमांचे पालन करीत आपआपल्या घरीच राहणे पसंद केले परंतु हा मुजोर व्यापारी मात्र आपला हा व्यवसाय जसाच्या तसा करीत आहे. परराज्यातून येणारा हा सुगंधित तंबाखू महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे. आता तर परराज्यातून वाहतूक ही बंद आहे. स्वतःजवळ असलेला स्टॉक मधील विषारी तंबाखूची मिलावट करून खुलेआम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा सुगंधित तंबाखू संपूर्ण जिल्ह्यात पुरवठा केला जात असून वाहनांवर जीवनावश्यक वस्तूचे लेबल लावून हा काळा व्यवहार सर्रास सुरू आहे. भरवस्तीत "मन" भरून बंदी असलेला तंबाखू अधिकारी-कर्मचाऱ्यांना "सुख" देऊन हा "लाल" खूलेआम कसा काय पुरवठा करीत आहे? याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. महत्वाचे म्हणजे ज्याठिकाणी या व्यापाराचे गोडाऊन आहे त्याच परिसरात एका माजी आमदाराचे यापूर्वी कार्यालय होते व आता आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या एका नेत्याने या ठिकाणी आपले कार्यालय थाटले आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपुरातील एका प्रतिष्ठितांचा विश्वासू याठिकाणी वास्तव्यास असतो. तरीसुद्धा हा व्यवहार एवढा खुले आम कसा काय सुरू आहे याचे आश्चर्य वाटत आहे. चंद्रपुरात अनेक ठिकाणी या व्यावसायिकाचे गोडावून व मुख्य दुकाने आहेत. जीवनावश्यक वस्तू शिवाय अन्य कोणत्याच दुकानांना संचारबंदी मध्ये परवानगी देण्यात आली नसतानासुद्धा या महाशयांचे गोडाउन मध्ये अनेक मजूर अल्पशा मजुरीने बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू ची मिलावट करून त्याची पॅकिंग करण्याचे कार्य करीत आहेत.
संचारबंदी दरम्यान पोलिस विभागाची गस्त मोठ्या प्रमाणावर शहरात वाढविण्यात आली आहे. बिना परवानगीने कुणालाही शहरांमध्ये भटकू दिल्या जात नाही. मग हा "गोडबोल्या" व्यापारी आपला व्यवसाय कसा काय करीत आहे? हे प्रश्नार्थक कोडे आहे. चंद्रपुरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या व्यापार्यावर कडक कारवाई करावी व त्याला चांगले "लाल" करावे अशी मागणी होऊ लागली आहे. मागील काही वर्षापासून सुगंधी तंबाखूची विक्री महाराष्ट्रात बंदी आणली आहे. परंतु हा तंबाखू तेव्हा विकला जात होता. बंदीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी या विक्रीवर बंदी आनंद कडक कारवाई करण्याचे करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते.