मुख्य अभियंता व उपमुख्य अभियंता वादाच्या भोवऱ्यात?
चंद्रपूर : चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन मध्ये असलेल्या क्वाटर चा घोळ नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये उघडकीस आला असून यात सिएसटीपीएस चे मुख्य अभियंता घुगे व उपमुख्य अभियंता ओसवाल यांचा सहभाग असल्यामुळे हे दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देशातील दुसऱ्या क्रम
असलेले चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन देशभरात नावाजलेले आहे.इतकेच नव्हे तर चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन मुळे चंद्रपुर शहर प्रदुषणातही अव्वल आहे.उर्जा उत्पादन करणाऱ्या या थर्मल पॉवर स्टेशन मध्ये जवळपास पाच हजार अधिकारी व कर्मचारी उर्जानगर वसाहतीत वास्तव्य करीत असतात. या वसाहतीचे दरवर्षी मुल्यांकन केले जाते. दरवर्षी शेकडो अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अदलाबदली होत असतात तर कुणी सेवानिवृत्त होत असल्याने ते वास्तव्य करीत असलेले क्वार्टर रिक्त होत असतात. वसाहतीचे देखभाल करण्याचे काम सिव्हिल विभागाचे असून मुख्य अभियंता,उपमुख्य अभियंता यांच्या देखरेखीखाली होत असते. दरवर्षी क्वाटरचा अधिकृत सर्व्हे केला जातो.यावर्षी सुध्दा करण्यात आले या सर्व्हेत ४२ क्वाटरचे सर्व्हे करण्यात आले त्यातील २० क्वाटर भाड्याने देण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. मात्र क्वाटर देण्यापासून ईतर सर्व इत्यंभुत माहीती सिव्हिल विभागाचे उमाटे यांच्याकडे आहे.मात्र त्यांनी स्वताचे क्वाटर नं.न्यु एफ टाईप१३७/८ हे मोहम्मद शेख या व्यक्तींना दि.१७ मे२०१२ पासून तर आतापर्यंत किरायाने दिले आहे.त्यांच्या आशीर्वादाने इतरही क्वाटर भाड्याने देत असतात त्यामुळे " तेरी भी चूप मेरी भी चूप" असल्याने भाड्याने क्वाटर देणार्यावर कार्यवाही करू शकत नाही. हे सर्व काळेभेरे मुख्य अभियंता व उप मुख्य अभियंता यांच्या आशीर्वादाने होत आहे. उर्जा उत्पादन करणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्यांना क्वाटर मिळत नाही.पण या क्षेत्राची कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तींना भाड्याने क्वाटर देण्यात येते ही अत्यंत गंभीर बाब आहे.असे अनेक बाबी उघड होत असल्याने मुख्य अभियंता घुगे व उप मुख्य अभियंता ओस्वाल यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.