चिरोली येथील प्रतिबंधीत क्षेत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पोहचविली मदत*



मुल तालुक्‍यातील चिरोली येथे आणखी एक रूग्‍ण कोरोना पॉझिटीव्‍ह आढळल्‍याने हा परिसर प्रतिबंधीत करण्‍यात आला आहे. तेथील नागरिकांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्‍वनीद्वारे प्रतिबंधामुळे निर्माण झालेल्‍या अडचणी सांगत मदतीची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी तात्‍काळ नागरिकांच्‍या मागणीची दखल घेत भाजपा पदाधिका-यांची चमू सदर परिसरात पाठवून मदत पोहचविली.
चिरोली येथील प्रतिबंधीत क्षेत्रात 700 जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स व भाजीपाला यासह मास्‍क, डेटॉल साबण, बिस्‍कीट पुडे यांचे वितरण भाजपा पदाधिका-यांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आले. यावेळी भाजपाच्‍या तालुकाध्‍यक्षा सौ. संध्‍याताई गुरनुले, माजी जि.प. सदस्‍य वर्षा लोनबले, मुल नगर परिषद उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, सुनिल आयलनवार, सुभाष बुक्‍कावार, सुभाष सुंभ, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, उज्‍वल धामनगे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण भासल्‍यास आ. मुनगंटीवार यांच्‍या वतीने आम्‍ही त्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असल्‍याची ग्‍वाही यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनी नागरिकांना दिली. केलेल्‍या मागणीची तात्‍काळ दखल घेत मदत पोहचविल्‍याबद्दल या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.