कोरोनाच्या सावटात गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक व इतर रिक्त पदे भरण्यासाठी कुलगुरूंचा अट्टहास



गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने गोंडवाना विद्यापीठाच्या वर्तुळात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या वतीने विद्यापीठीय शिक्षक भरती च्या नादात या विद्यापीठाचे कुलगुरू भविष्यातही कर्मचाऱ्यांचे आरोग्याचे पर्वा न करता जीव धोक्यात घालतील. अशी भीती निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दिनांक २५ मे २०२० ला तक्रार दाखल केलेले आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्र-कुलगुरू यांच्याकडून (टाळेबंदी) लॉकडाउन काळात होत असलेली नियमबाह्य भरती बाबत पत्र सादर केलेले आहे. ऑनलाईन मुलाखती व दस्तऐवज सादर करण्याची तरतूद महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात नाही. मुळात शंभर (१००) पॉइंट रोस्टर डिफेक्टिव्ह आहे. शासनाने नविन रोस्टर अजूनपर्यंत केला नाही . ओबीसी समाजाला पदभरतीत एकही जागा नाही . आशा परिस्थितीत उच्च न्यायालयाने सुद्धा पदभरती च्या संदर्भात नियुक्तीचे आदेश देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिनांक १६.०६.२०२० ला दिलेले आहे.
कोरोना मुळे औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १६ अधिकारी व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मुंबई विद्यापीठात ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास ६०  ते ७०  कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. विद्यापीठात सुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  अशा परिस्थितीत माननीय कुलगुरूंनी कोरोनाच्या भितीयुक्त वातावरणात पदभरती केली तर लॉकडाऊन मुळे अनेक उमेदवार  पद भरतीप्रक्रिया पासून वंचित राहतील व त्यामुळे भविष्यात अन्याय होण्याची दाट शक्यता आहे.असे अँड.  गोविंद भेंडारकर 
सिनेट सदस्य तथा स्थायी समिती       
सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केले आहे.