चंद्रपूर चे लोकप्रिय आम. किशोर जोरगेवार आज कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना वाढता कहर बघता सर्वांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोना लहान-मोठा पाहून येत नाही, सर्वांनी योग्य ती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. शासनाच्या निर्देशांचे योग्य ती पालन करावे आलेल्या संकटाशी धैर्याने समोर यावे असे आव्हान या स्थितीतही आमदार किशोर जोरगेवार यांनी जनतेला केले आहे. आपली प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार काल त्यांच्या स्वाब घेण्यात आला असून त्याचा रिपोर्ट मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता संख्याही दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्याची स्थिती गंभीर असल्याचे जाणवत आहे. यासंदर्भात शासनाने प्रशासनाने वेळोवेळी निर्देश दिले असून त्याचे योग्य ते पालन करणे गरजेचे आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क हा तगडा होता. या स्थितीतही त्यांनी जनसामान्यांच्या समस्यांना धावून जाण्याचे चे मोठे कार्य ही जोरगेवाऱ यांनी या काळामध्ये केले होते.