Zpदिव्यांग व्यक्ती व संस्थांचा उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार




चंद्रपूर: दिव्यांग कायदा २०१६ महाराष्ट्रात २ ऑक्टोबर २०१८ मध्ये लागु झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी विविध माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्ति व संस्थाचा स्वतंत्र्यदिनी सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सदर सन्मानपत्र जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले.
दिव्यांग कल्याणासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ज्यामध्ये लघुउद्योग, स्वयंरोजगार, सहाय्यक उपकरणे, शेतीपूरक व्यवसाय, आदी योजनांची तसेच आमदार-खासदार निधी मधून सहाय्यक उपकरण वितरित शिबिर, अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन योजने अंतर्गत स्वयंचलित तीन चाकी सायकल वितरित शिबिर, दिव्यांग कायदा, स्वावलंबन कार्ड, दिव्यांग मतदार जागृती तसेच मतदार नोंदणी याबाबतची समाज कल्याण अधिकारी सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रभावीरीत्या जन सामान्यामध्ये जिल्हाभर केलेल्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेत दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपरपज सोसायटी चंद्रपूरचे, कल्पना शिंदे, दर्शना चाफले, स्नेहल कन्नमवार, भाग्यश्री कोलते, गीता भडके, निलेश पाझारे, सतीश मुल्लेवार, शिवशंकर कोलते, मुन्ना खोब्रागडे, रुपेश रोहणकर, शिवसागर लटारु, रविंद्र उपरे, प्रमोद डोंगरे, मारोती काकडे, अनिल आत्राम, राजू मेश्राम, सचिन फुलझेले, उत्तम साव, अर्पिल चौधरी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला गेला.