जुनी पेन्शन योजना लागू करा शिक्षक परिषदेची मागणी




महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा जिवतीच्या शिष्टमंडळाने मा. उस्तू सीताराम गेडाम नायब तहसीलदार जिवती यांच्या मार्फत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच श्री.देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या अति महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांच्या बाबत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने राज्यव्यापी निवेदन मोहीम छेडण्यात आली आहे.सदर निवेदनात राज्यातील सर्व डी सी पी एस धारकांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. 1नोव्हेंबर2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती/ नैसर्गिक मृत्यू झाला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी. सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक /माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी.विस्ताराधिकारी( शिक्षण) केंद्र प्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून तात्काळ भरावीत. राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना तात्काळ लागू करावी.जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावीत.covid-19साथरोग नियंत्रण ड्युटी करत असताना ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे अशा शिक्षकांच्या कुटुंबीयांना तातडीने 50 लाखाचे विमा संरक्षण मिळावे सदरील 50 लक्ष रुपयांचे अनुदान रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अदा करावी.२७/०२ च्या जिल्हा अंतर्गत बदली च्या शासन निर्णया नुसार जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या प्रक्रिया सर्व जिल्हा परिषदा मध्ये तात्काळ राबविण्यात यावी.या मागण्याचा समावेश निवेदनात होता.निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका जिवती अध्यक्ष विकास तुरारे,कोषाध्यक्ष निलेश भुडे,पंडीत राठोड संघटनमंत्री,उपाध्यक्ष प्रफुल चिव्हाणे ,प्रसिद्धि प्रमुख अशोक मगरे , उपस्थित होते.