मुल पंचायत समितीला 10 संगणक संच उपलब्‍ध



मुल प्रतिनिधी:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या आमदार निधीच्‍या माध्‍यमातुन मुल पंचायत समितीला 10 संगणक संच उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे.
दिनांक 1 जुलै रोजी पंचायत समिती मुलच्‍या इमारतीत कर्मचा-यांसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या वाचनालयाचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार आणि संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे यांनी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मुल पंचायत समितीला 10 संगणक संच उपलब्‍ध करून देण्‍याबाबत शब्‍द आ. मुनगंटीवार यांनी दिला होता. या आश्‍वासनाची पूर्तता झाली असून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल पंचायत समितीला स्‍थानिक विकास निधी अंतर्गत 10 संगणक संच उपलब्‍ध करून दिले आहे. दिनांक 4 सप्‍टेंबर रोजी या संगणक संचांचे उदघाटन मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी उपसभापती घनश्‍याम जुमनाके, पंचायत समिती सदस्‍य जयश्री वलकेवार, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी सभापती चंदू मारगोनवार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द पूर्ण केल्‍याबद्दल त्‍यांचे आभार व्‍यक्‍त केले.