सिंदेवाही तालुुक्यात कोरोना रूग्णाची संख्या
वाढत असून १० ते ११ हजार लोकसंख्या असलेल्या नवरगावात सप्तेबर महीण्यात पहीला रूग्ण आढळून आल्यानंतर दिवसागणिक एक - एक रूग्ण संख्या वाढीला लागले असून शुक्रवारला एकाच दिवशी तीन रूग्ण आढळून आहे. यापूर्वी नवरगाव प्राथमिक स्वास्थ केंद्रातील २ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने रविवार पर्यंत आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. नवरगाव व्यापारी संघटनेच्या वतीने ग्रामपंचातीला निवेदन देवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फू करण्याची मागणी केली. मागणीनुसार ग्रामपंचायत प्रशासनाने रविवार ते मंगळवार ३ दिवस सर्व नवरगांव बाजारपेठ बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश काढीत गावात मुनादी देण्यात आली. प्रत्येकांनी आपापल्या घरीच राहुन कोरोनाची साखळी खंडीत करायला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.