सावली - मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकरिता जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरीब पालकांकडून उत्पन्नाचा दाखला न घेता शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा ही मागणी पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी केले आहे.
इतर मागासवर्ग प्रवगातील गरीब कुटुंबातील अनेक मुलाना त्याच्या पालकांच्या पारंपरिक व्यवसायामध्ये
मदत करावी लागते. ज्या गरीब कुटुंबातील मुले शाळेत नियमितपणे जावू शकत नाही. त्यामुळे इतर मागासवर्ग प्रवगातील गरीब कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने भारत
सरकारची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 1998-99 पासून सुरु केलेली आहे. सदरची योजना सन 2017-18 या वर्षापासून सुधारीत करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता 2 लाख 50 हजार उत्पन्न मर्यादेतील कुटुंबातील विद्यार्थ्यांना लाभ देण्याची तरतूद आहे. पण याकरीता तहसीलदार यांचे उत्पन्न दाखला मागविण्यात येत आहे. ही अट शासकीय परिपत्रकात नसताना पालकांना विनाकारण मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड बसत असल्याने व जिल्हा परिषद शाळेत फक्त गरीब विद्यार्थी शिकत असल्याने उत्पन्न दाखला न मागता शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा ही मागणी सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी समाजकल्याण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचेकडे केली आहे