आज दिनांक- ३ जाने.२०२० ला जि.प.उच्च प्राथ.शाळा,भं.तळोधी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ' महिला शिक्षण दिन' मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.रेखा कारेकर मॅडम,मुख्याध्यापिका,भं.तळोधी तर प्रमुख वक्ते म्हणून मान. अनिकेत दुर्गे,युवा वक्ते व लॉक डाउन शाळेचे निर्माते हे तर प्रमुख अतिथी म्हणून मान. मडावी सर,वि. शि.,मान. उईके मॅडम,वि. शि.,मान. दुशांत निमकर सर,वि. शि.,मान. राजेश्वर अम्मावार सर,मान.धाबर्डे ताई,चालूर कर ताई,रासमलवार ताई,मडकूवार ताई आणि सावित्रीच्या वेषेतील बालिका कु.दृष्टी तादूरवार मंचावर उपस्थित होते.
प्रथमतः कार्यक्रमाच्या अध्यक्षा मान. सौ.रेखा कारेकर मॅडम,मुख्याध्यापिका यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मान. मडावी सर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. मंचावर उपस्थित मान्यवर मान.अनिकेत दुर्गे,युवा वक्ते यांनी सावित्रीमाईची थोरवी आपल्या मनोगतातून मांडत त्यांचे विचार अंगिकरात विद्यार्थ्यांनी पुढे यावे.असे आव्हान केले व एक अप्रतिम असे गीत सादर केले.मान. दुशांत निमकर सर,मान. उईके मॅडम यांनी सावित्रीमाईच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना पुढे खूप शिकण्याचा संदेश दिला.
या दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मान. मालन धाबर्डे ताई यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा व सावित्रीमाई यांचेवर स्वयंलिखित गीत आपल्या गोड स्वरात सादर केले.
अध्यक्षीय भाषणात सौ.कारेकर मॅडम यांनी सवित्रीमाईच्या कार्याला उजाडा देत या माईमुळेच आज मी घडले व माझ्या कुटुंबाला घडविले.अशा मार्मिक शब्दात माईंच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वेदिका श्रीरामवार हिने केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मान. राजेश्वर अम्मावार सर यांनी मानले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.अशाप्रकारे अतिशय उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली.