घुग्‍गुस वासियांच्‍या मनातील प्रेमाचे स्‍थान आमच्‍यासाठी महत्‍वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार




आज सर्वच क्षेत्रात स्‍त्री शक्‍तीने आपले
वर्चस्‍व व श्रेष्‍ठत्‍व सिध्‍द केले आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारने महिलांच्‍या कल्‍याणार्थ अनेक निर्णय घेतले आहेत. राज्‍यात आमची सत्‍ता असताना महिलांच्‍या हिताचे अनेक निर्णय आम्‍ही घेतले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनांच्‍या लाभार्थी असलेल्‍या विधवा, परित्‍यक्‍ता, दिव्‍यांग, निराधार भगिनींना मिळणा-या 600 रू. अर्थसहाय्यात 1000 रू. पर्यंत वाढ केली आणि दोन अपत्‍ये असणा-यांना 1200 रू. इतके अर्थसहाय्य देण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला. आज जरी राज्‍यात तरीही लोककल्‍याणाचे हे कार्य अव्‍याहत सुरू आहे व राहील. आमच्‍यासाठी सत्‍ता महत्‍वाची नसून सेवा महत्‍वाची आहे. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती मधील खुर्ची आमच्‍या दृष्‍टीने महत्‍वाची नसून घुग्‍गुस वासीयांच्‍या मनातील प्रेमाची खुर्ची आमच्‍यासाठी महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी घुग्‍गुस येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे आ‍योजित मकर संक्रमण उत्‍सव तसेच महिलांच्‍या सांस्‍कृतीक महोत्‍सवात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा महिला मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्षा सौ. उमा खापरे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला मोर्चाच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे, सरचिटणीस सौ. अश्‍वीनी जिचकार, भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा अलका आत्राम, माजी महापौर तथा महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, घुग्‍गुस भाजपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहूले, उपमहापौर राहूल पावडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, स्‍त्री शक्‍तीचा पराक्रम, स्‍त्री शक्‍तीचे संस्‍कार हे आपल्‍या श्रेष्‍ठ भारतीय संस्‍कृतीचे बलस्‍थान आहे. स्‍त्री तेजस्‍वीनी, शक्‍तीदायिनी आहे. विरांगणा झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर अशा थोर महिलांचा वारसा आम्‍हाला लाभला आहे. आपल्‍या विदर्भाच्‍या भूमीत प्रभू श्रीरामचंद्रांची आजी इंदूमती, भगवान श्रीकृष्णाची प्रेरणा असलेली माता रूक्‍मीणी अशा श्रेष्‍ठ स्‍त्रीया जन्‍माना आल्‍या आहेत. या स्‍त्री शक्‍तीला आपण नमन करत असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
घुग्‍गुसमध्‍ये आयोजित या मकर संक्रमण उत्‍सवाला मोठया संख्‍येने नारी शकती उपस्थित आहे. आजच्‍या स्‍त्रीने पुरूषांच्‍या खांदयाला खांदा भिडवून प्रगतीची नवनवीन शिखरे गाठली आहे. पराक्रम, बुध्‍दीचातुर्य, साहित्‍य, कला, संसार, विज्ञान, अनुसंधान अशी सर्वच क्षेत्रे स्‍त्रीयांनी काबीज केली आहे. महिला आत्‍मनिर्भर व्‍हाव्‍या, स्‍वयंपूर्ण व्‍हाव्‍या यासाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अनेक महत्‍वाचे निर्णय घेतलेत. राज्‍यात आ. मुनगंटीवार अर्थमंत्री असताना महिलांच्‍या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. भारतीय जनता पार्टी महिलांच्‍या कल्‍याणार्थ सदैव कटिबध्‍द असल्‍याचे सौ. उमा खापरे यावेळी बोलताना म्‍हणाल्‍या.
घुग्‍गुस शहरात आम्‍ही भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन विकासाची मोठी मालिका तयार केली असल्‍याचे सांगत भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे म्‍हणाले, मकर संक्रांतीचे औचित्‍य साधुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात महिलांचे हे मोठे एकत्रीकरण आम्‍ही आयोजित केले आहे. घुगगुस भाजपातर्फे दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 30 जुलैला महाआरोग्‍य शिबीरात एक हजार नागरिकांची आरोग्‍य तपासणी व रोगनिदान करण्‍यात आले, रक्‍तदान करण्‍यात आले. भाजपाच्‍या माध्‍यमातुन सेवाकेंद्र आम्‍ही चालवित आहोत. घुग्‍गुस वासियांच्‍या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी वचनबध्‍द असल्‍याचे देवराव भोंगळे यावेळी बोलताना म्‍हणाले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. किरण बोढे यांनी केले. या कार्यक्रमाच्‍या आयोजनासाठी घुग्‍गुस भाजपाच्‍या अध्‍यक्षा पूजा दुर्गम, प्रयास सखी मंचाच्‍या मुख्‍य मार्गदर्शक सौ. अर्चना भोंगळे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, कुसुम सातपुते, वसुधा भोंगळे, सुनिता पाटील, सारिका भोंगळे, लक्ष्‍मी नलभोगा, नंदा कांबळे आदींनी अथक परिश्रम घेतले. भाजपा महिला आघाडी आणि प्रयास सखी मंच यांनी संयुक्‍तरित्‍या या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने महिलांची उपस्थिती होती.