कोराडीत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने उषा शाहू रा.काँ.जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात महिला शिक्षक दिन साजरा



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंत पाटील, प्रेरणास्थान राज्याचे गृहमंत्री मा.श्री.अनिलजी देशमुख,महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांचे सुचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयातून मानवंदना म्हणून सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी मोठ्या उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर(ग्रा) "महिला शिक्षक दिन" म्हणून साजरा करत आहे.
कोराडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रम साजरे होत असतानाच जिल्हाध्यक्ष श्री शिवराज (बाबा) गुजर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. अर्चनाताई हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष श्री. भुषण चंद्रशेखर यांच्या विशेष सहकार्याने महिला जिल्हा उपाध्यक्ष उषा रघुनाथ शाहू यांच्या नेतृत्वात 'महिला शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात पार पडला. उषा शाहू यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पणती लावून कार्यक्रमाची सुरवात केली. मुली व महिलांना प्रेरणादायी असलेल्या कोराडी येथील शालेय शिक्षिका सुजाता नारायण इंगोले (सौ.भालेराव), शिक्षिका सौ.प्रिया प्रतीक धोपेकर, अंगणवाडी सेविका सौ.योगिता दिलीप आरसपुरे, सौ.लक्ष्मी वासुदेव भांडारकर,सौ.सुनंदा ताराचंद काळे,आशा वर्कर सौ.सुरेखा विश्वजीत रंगारी, खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय परिचारिका सौ.लक्ष्मी लोखंडे, पशुवैद्यकीय परिचारिका प्रशिक्षणार्थी सौ.कोमल मंगेश उचित,डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण ज्योती चंद्रशेखर,आय.टी.आय.उत्तीर्ण कु.गौरी रविंद्र थोरात, कु. सुर्यकांता महादेव भालेराव, कु.कविता बालचंद खोब्रागडे, वाणिज्य शाखेत उच्च शिक्षित मीना सखाराम रणवीर, विज्ञान शाखेत उच्च शिक्षित/रांगोळी आर्टिस्ट सौ.शीतल रोशन इंदूरकर, महानिर्मिती कोराडी स्कूलबस वर कार्यरत मदतनीस सौ.सविता किशोर जनबंधु, सौ.चित्ररेखा संतोष शाहू, उच्च शिक्षित श्वेता भांडारकर,सौ.कविता निराडकर, कु.स्वाती रविंद्र थोरात, शासकीय तंत्रनिकेतन नागपूर स्थापत्य अभियांत्रिकीत उच्च टक्केवारी घेणारी कु.विशाखा संतोष शाहू, कु.तेजस्विनी अनकर यांना उषा शाहू यांच्या हस्ते पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्वांकरिता अल्पोपहार व केक चे वाटप करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत असलेल्या वेदिका गजानन घनमोडे, हंसिका मनोज गाऊत्रे, सलोनी संतोष ढोके, माही मनीष जवारे,आलिया पटेल,आफिया शेख,संबोधी रोशन इंदूरकर,यशस्वी विवेक नारनवरे या चमुकल्यांनी उपस्थित सर्वांचे लक्षकेंद्रित केल्याने सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
राजकिय व सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, शिक्षण,आरोग्य,क्रीडा,कौशल्य व उद्योजक्ता क्षेत्रामध्ये आदरणीय गृहमंत्री मा.श्री.अनिलजी देशमुख साहेब यांचे उतुंग कार्य असून त्यांचे व्यापक कार्य फक्त मुलाखती पर्यंत सीमित न राहता देशभर त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. त्यामुळे गृहमंत्री मा.श्री.अनिल देशमुख यांचे कार्य संपूर्ण महिला व मुलींना विशेष प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष उषा शाहू यांनी केले.
जिल्हा उपाध्यक्ष उषा शाहू यांनी महिला व मुलींना उद्देशून या कार्यक्रमात सर्वांसमक्ष संकल्प केला की,"शक्ती कायदा" चा प्रचार - प्रसार गावोगावी करू या! महिला, मुलींना आत्मशाली व निडर बनवू या!


"आपण सावित्रीच्या मुली शासकीय कार्यालयातील कंत्राटदारीत महिलांना अशोभनीय व पक्षपाताची वागणुक देणाऱ्यांविरोधात कडेकोर कार्यवाही करूया!"असे त्या म्हणाल्या.
महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील निमंत्रित होते, त्यांनीही या महिला शिक्षक दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाईंना अभिवादन केले. यावेळी सौ.प्रीती चंद्रशेखर, सौ.सविता विवेक नारनवरे, सौ.सरिता अरविंद चांदूरकर, सरिता बिलोने,सौ.रेणुका तानाजी कांबळे,सौ.ममता मुकेश बावनकर,सौ.रंजना दुपारे, सौ.शीतल वाघमारे,सौ.रिता भामकर,सौ.गायत्री नंदेशवर, सौ.शिलवंता लांजेवार, सौ.संध्या चव्हाण, सौ.सुकलिया शाहू,छाया प्रल्हाद उचीत,निशिका लोखंडे, चारुशीला चंद्रशेखर,पूनम लांजेवार, लता शाहू उपस्थित होते.