ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी २२फेब्रुवारीला गडचिरोलीत महामोर्चा




ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत करुन त्या आरक्षणात मराठा समाजासह अन्य कोणत्याही प्रवर्गाचा समावेश करु नये, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या २२ फेब्रुवारीला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर १ लाख ओबीसींचा मोर्चा काढण्याचा निर्णय ओबीसी समाजबांधवांनी घेतला आहे.
सोमवारी १ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची सभा गडचिरोली येथे पार पडली. या सभेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी आरक्षणात मराठा समाजासह इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर इत्यादी जिल्ह्यांतील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, एससी,एसटी समाजाप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे, इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करुनही समस्या सुटत नसल्याने २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर १ लाख ओबीसींचा मोर्चा काढण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला.
या सभेला रमाकांत ठेंगरी, सुरेश भांडेकर, श्री.दहेलकर,अजय कंकडलावार,रमेश बारसागडे,प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर मशाखेत्री, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रा.शेषराव येलेकर, भास्कर बुरे, पंकज खोबे, अनिल कोठारे, प्रशांत वाधरे, सतीश विधाते, बोरकर, दादाजी चापले, दादाजी चुधरी, प्रा देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, रमेश भुरसे, प्र.डॉ. रामचंद्र वासेकर, मारोती दुधबावरे, पांडुरंग भांडेकर, दत्तात्रय खरवडे, राजेंद्र उरकुडे, विठ्ठलराव कोठारे, रामराज करकाडे, नंदू नाकतोडे, पंकज धोटे, गोपाल घोगडे, जितेंद्र मुनघाटे, अजय लोंढे, धनपाल मिसार, विलास चूधरी, सचिन गोंगाल, रमेश चौधरी, रूचित वांढरे, रामेश्वर खोब्रागडे, प्रशांत बनकर, मनोज निंबार्ते, नरेंद्र भरडकर, भाऊराव पोरटे, संतोष गझलपल्लीवार, नेताजी बारसागडे, शामराव वाढई, मनोज पोरटे, किशोर ठाकरे, विनायक बांदूरकर, पांडुरंग घोटेकर, विनायक झरकर, शंकरराव सालोटकर, शंकर पारधी, प्रा.दामोधर शिंगाडे, ज्ञानदेव पिलारे, लोकमान्य बरडे, बुल्ले, लोमेश राऊत, किरण कारेकर, देवराव मोहूर्ले, योगेश सोनुले, पुरुषोत्तम लेंगुरे, प्रभाकर कोटरंगे, केशव निंबोड, हरिदास कोटरंगे, शंकर चौधरी, महादेव वाघे, धनराज चुधरी, मंगेश चुधरी, मंगेश भोयर, योगेश नैताम, प्रशांत किरमे, संजय लोणारे, प्रा. पुरुषोत्तम ठाकरे, सुधीर झुंजाळ, संजय घोटेकर, रोशन भोयर अक्षय जककुनवार, बंडू सातपुते, पालाश भोयर, प्रवीण ठेंगरी, चेतन भोयर, वामन किन्हेकर, सदाशिव वाघरे, राहुल मुनघाटे, विलास मस्के, मुक्तेश्वर काटवे, गणेश मुलकलवार, राजेंद्र आडे, संतोष मोहूर्ले, सुखदेव जेंगठे, रत्नदीप मशाखेत्री, प्रमोद भगत, देवराव चवळे, सुनील पारधी, भास्कर नरुले, जितेंद्र ठाकरे, चंद्रकांत शिवणकर, धनंजय हिवसे, आशिष ब्राम्हणवाडे, आशिष मशाखेत्री, नरेंद सालोटकर, विक्की मस्के, संतोष ठाकरे, हितेंद्र तुपट, पांडुरंग नागापुरे, अरुण दुपारे, नीलेश तितिरमारे, कमलेश बोरकर गिरीधर मुंडले, राजू बुल्ले, संदीप शेंडे, सागर वाढई, चैतन्यदास विधाते, हरिदास खरकाटे, रामेश्वर दोनाडकर, संदीप वाघाडे, हिरालाल शेंडे, नितीन राऊत, सागर वाढई, नीलेश तितिरमारे, गौरव येणप्रेड्रीवार उपस्थित होते