चंद्रपूर क्रांती,प्रतिनिधी
बाजार समितीचे उत्पन्न वाढले
अतुल गण्यारपवार सभापती पदी पदारुढ होण्यापूर्वी या बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ३२ लाखांवर होते. अतुल गण्यारपवार सभापती पदावर पदारुढ झाल्यानंतर बाजार समितीच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होत गेली व दरवर्षी वाढ होत होत सन २०१९-२० मध्ये बाजार समिती चामोशीर्चे उत्पन्न ३.१४ कोटी झाले असून वाढावा ९० लाख झालेला आहे. तसेच कार्यरत संचालक मंडळाने शेतकन्यांकरिता बाजार समिती चामोर्शीमध्ये अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्याने सन २०१७-१८ मध्ये उत्कृष्ट बाजार समितीचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे यांनी दिलेला आहे. कृषी उपन्न बाजार समिती चामोर्शीमध्ये अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्याने नक्षलग्रस्त वनव्याप्त, आदिवासी, शैक्षणिक, आर्थिक मागासलेल्या उद्योगविरहीत, मोठे सिंचनप्रकल्प नसताना शेतकऱ्यांना स्वतः कष्टाने पिकविलेला शेतमाल विक्रीकरीता वर्षभर खरेदी-विक्रीचे व्यवहार अविरत सुरळीत सुरू आहेत.
गडचिरोली चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचे २४ सप्टेंबर २०२० रोजी पाच वर्षे पूर्ण झाले. यानंतर शासनाने कोविड पार्श्वभूमिवर निवडणूक सहा महिने पुढे ढकलली होती. बाजार समितीच्या संचालक मंडळाला सहा महिने मुदतवाढ देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, ना. विजय वडेट्टीवार यांनी या मुदतवाढीला विरोध दर्शविला होता. त्यामुळे संचालक मंडळाने न्यायालयाकडे दाद मागितली. या -अनुषंगाने उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनाने चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला एक वर्षे मुदतवाढ दिली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बाजार समिती चामोर्शीने बाजार समितीची निवडणूक घेण्यात यावी, असे जिल्हा अनिबंधक सहकारी संस्था यांना पत्र पाठवून विनंती केली होती. परंतु, भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्र शासनाने बाजार समित्यांची निवडणूक सहा महिने पुढे ढकलली, त्यानंतर बाजार समिती चामोर्शीने सहा महिने निवडणूक कामकाज वाढविल्यामुळे बाजार समिती चामोशींचे कार्यरत संचालक मंडळास सहा महिने मुदतवाढ मिळावी, याकरिता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, ना. विजय वडेट्टीवार यांच्याविरोधामुळे शासनाने मुदतवाढ देण्यास विरोध केला. परंतु, महाराष्ट्र शासनाने ज्या बाजार समित्यांचा कालावधी संपला आहे. अनेक ठिकाणी कार्यरत संचालक मंडळास मुदतवाढ दिली, तर काही ठिकाणी कार्यरत संचालक मंडळाऐवजी प्रशासकीय मंडळ बसविले व काही ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली. त्याप्रमाणे कृषी उपन्न बाजार समिती चामोर्शी येथे कार्यरत संचालक मंडळास मुदतवाढ देण्याकरिता ना. विजय वडेट्टीवार यांनी विरोध केल्याने महाराष्ट्र शासनानी बाजार समिती चामोर्शीचे संचालक मंडळास मुदतवाढ नाकारली.
त्यामुळे बाजार समिती चामोशीने उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठात याचिका दाखल करून बाजार समिती चामोशींच्या कार्यरत संचालक मंडळाला नियमानुसार राज्यातल्या इतर बाजार समित्यांना मुदतवाढीच्या दिलेल्या निर्णयाप्रमाणे मुदतवाढ देण्याची विनंती केली असता उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी बाजार समिती चामोर्शीच्या संचालक मंडळाला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी शासनाने मुदतवाढ नाकारलेल्या आदेशालाअपील करण्याची सुचना केली. त्याप्रमाणे केस दाखल करून सोमवारला दुपारी २ वाजता निकाल लागायच्या आधी राजकीय दबावामध्ये दुपारी १ वाजता प्रशासकांनी कार्यभार स्वीकारला. त्यामुळे सभापती अतुल गण्यारपवार यांनी उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केली असता उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने बाजार चामोर्शीची मुदतवाढ नाकारल्याचे आदेश जिल्हा व उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी नियुक्त केलेले प्रशासकाचे आदेश रद्दबातल करीत पुन्हा शासनाकडे मुदतवाढीचे प्रस्ताव सादर करण्यास निर्देशित केले. त्याप्रमाणे अतुल गण्यारपवार यांनी बाजार समितीच्या तत्कालीन कार्यरत संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात यावी, याकरिता राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर सहकार व पणन मंत्री यांनी २० एप्रिल २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेत याचिकाकर्त्यांचे म्हणने ऐकूण बाजार समिती चामोर्शीचे कार्यरत संचालक मंडळाला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली. त्याप्रमाणे सभापतीअतुलभाऊ गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लीक व संचालक मंडळाने शुक्रवार २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता बाजार समिती चामोर्शी येथे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक गडचिरोली तथा सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी अमोल गण्यारपावर यांचे उपस्थितीत सहाय्यक सचिव यांचेकडे आदेशाची प्रत देवुन कार्यभार स्वीकारला.
काही स्थानिक मोठे व्यापाऱ्यांनी बाहेरच्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजार समितीचे मार्केट बंद पाडण्याचा प्रयत्न केला व बाजार समितीचे विरोधात पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट दाखल केली. परंतु जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी बाजार समितीने केलेली कार्यवाही नियमानुसार असल्याचे पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर सदर रिपोर्ट खारोज करण्यात आली. सभापती व कार्यरत संचालक मंडळाने बाजार समितीचा सुरू असलेला मार्केट बंद पडू दिला नाही व शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या व सुरू मार्केटला बंद करण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या दबावात न येता कठोर परिश्रम घेवुन मार्केट चालविणाऱ्या संस्थेला ना. विजय वडेट्टीवार यांचे विरोधामुळे शासनाने मुदतवाढ दिली नव्हती. विजय वडेट्टीवार, भाजपा व इतरांनी मिळून कार्यरत संचालक मंडळाच्या विरोधात निवडणूक लढून हरलेली होती. काही वरिष्ठ व विशिष्ट व्यापारी बाजार समितीचेप्रती वर्षाला ६ ते ७ लाख सेस फी भरत होते. आता सदर व्यापाऱ्यांना ५० ते ६० लाख वर्षाला सेस फी भरावी लागते. त्यामुळे सदर व्यापारी सभापती अतुल गण्यारपवार यांच्या कठोर निर्णयांचा विरोध करीत असतात. पण सभापती अतुल गण्यारपवार हे शेतकऱ्यांना न्याय देत असतात. व्यापारी अडते, मापारी, हमाल यांचा समन्वय साधून संचालक मंडळ अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्याने बाजार समितीला प्रगतीकडे नेत आहेत.
चामोर्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारी व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार शिशिर शिंदे, कृउबास हिंगणघाटचे सभापती सुधीर कोठारी, प्रवीण देशमुख यांचे आभार मानले आहेत.
काँग्रेस नेत्यांनी विरोध करू नये; संचालक मंडळाची विनंती
खासदार, आमदार, विधान परिषद, जिल्हा परीषद, नगरपंचायत, महाविद्यालयीन निवडणुकांपासून सर्व ठिकाणी काँग्रेस व महाविकास आघाडीला जाहीरपणे मदत करीत असताना काँग्रेस नेत्यांनी विरोध करू नये, अशी विनंती बाजार समितीचे संचालक गोसाई सातपुते, रामचंद्र बाम्हणकर, सुधाकर निखाडे, नितेश गद्देवार, बाजीराव गावळे व इतर संचालकांनी केली आहे.