चंद्रपूर शहरात आज देशी दारू व बार दुकानाचे थाटात उद्घाटन !



चंद्रपूर :-आज दोन जुलै चंद्रपूर शहरांमधील एका देशी दारू दुकानाचे फथटा मध्ये उद्घाटन करण्यात आले. 27 जून ला राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारू बंदी उठविण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ८ जुनं ला या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला. दारूची दुकाने आत्ता सुरू होईल नंतर सुरू होईल याची प्रतीक्षा मद्यपी बघत होते. शासन निर्देशाप्रमाणे 11 जून रोजी उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या नावे काढलेल्या आदेशांमध्ये दिशानिर्देश करीत व काही सूचना जाहीर करत कागदपत्र सादर करण्याचे कामे सुरू झाली. मुंबई राज्य आयुक्तांनी दिलेल्या दिशा निर्देशाप्रमाणे कागदपत्र सादर झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच दारू दुकानांचे परवाने नूतनीकरणाची कारवाई सुरू होईल असे जाहीर केले. अद्यापपावेतो राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील किती परवाने नूतनीकरण झाले याची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आज दोन जुलै रोजी चंद्रपूर शहरातील काही बार ॲड रेस्टॉरंट व देशी दारू विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची थाटात उद्घाटन केले. असे उद्घाटन नूतनीकरण किंवा अन्य कारवाई झाल्याशिवाय करू शकतात का हा आजचा चर्चेचा विषय ठरला आहे.?