भीम आर्मी चा दणका



ऊर्जानगर ग्रामपंचायत अंतर्गत कोंडी वॉर्ड क्रमांक 5 येथील रस्त्याचे बांधकाम खनिज निधी कार्यक्रम अंतर्गत करण्यात आले. मुख्य चौकात महात्मा जोतिबा फुले चौक नावाचे लोखंडी फलक सन 14 ऑक्टोबर 1989 पासून ग्रामपंचायत इथे नोंदणीकृत झालेले असताना देखील जातीय द्वेशाच्या भावनेतून तो फलक काढून त्याला नालीच्या बाजूला फेकून त्याच ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याचा मजबूत फलक आज दिनांक 28/07/21 रोजी लावण्यात आला. हा सत्तेचा आलेला माज मनाव कि हुकूमशाही ज्या महामानवाच्या पायाखाली बसण्याची सुद्धा ज्यांची लायकी नाही त्या मंत्र्याचे फलक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे फलक काढून लावण्यात आले.
सदर बाब भीम आर्मी चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेंद्र भाऊ रायपुरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी चंद्रपूर जिल्हाप्रमुख जितेंद्र भाऊ डोहणे व पदाधिकाऱ्यांना,सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे खुशाल तेलंग सर, डॉ. राकेश गावतुरे यांना भ्रमंध्वनी करून विषयांचे गांभीर्य लक्षात आणून दिले असता सर्वांनी त्वरित ऊर्जानगर ग्रामपंचायत इथे उपस्थिती दर्शविली व सदर विषयाचा निषेध नोंदविला.
भीम आर्मीने जेव्हा भीम आर्मी स्टाइल ने दणका दिला तेव्हा संबंधित कंत्राटदार देवानंद थोरात, सरपंचा येरगुळे, सचिव भानासे यांनी थातूर मातुर उत्तर देऊन विषय टाडण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा भीम आर्मी च्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली व बजावले कि ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या प्रेरणास्थान असलेल्या महामानवाचा फलक नालीच्या बाजूला टाकला त्याच प्रमाणे आम्ही तुमची लायकी दाखवून नालीच्या बाजूला नाही तर नालितच टाकू तेव्हा पढता पाय घेत जाहिररित्या माफी मागितली व लिपिक प्रवीण मुंजनकर यांनी विषयांचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित ते फलक संबंधित कंत्राटदारास उपडण्यास लावले व महात्मा ज्योतिबा फुले चौक यांचे फलक पूर्ववत लावले.
या प्रसंगी प्रामुख्याने भीम आर्मी जिल्हा प्रमुख पु. विभाग जितेंद्र भाऊ डोहणे, प. विभाग जिल्हा प्रमुख शंकर भाऊ मुन, जिल्हा महासचिव सुरेंद्र भाऊ रायपुरे, जिल्हा प्रवक्ता विजय गेडाम, महानगर प्रमुख प्रशांत भाऊ रामटेके, उपप्रमुख राजू सोदारी,तालुखा उपप्रमुख संघप्रकाश भाऊ ठमके, संघटक ब्रिजेशभाऊ तामगडे, महानगर सचिव प्रणित तोडे, तालुका सचिव हिमांशु आवळे, संगम सांगोरे,माजी उपसरपंच देविदास रामटेके,सोनल भगत, युसूफ पठाण,सोनू गेडाम, प्रीतम रायपुरे, जितेंद्र रायपुरे, चित्रसेन रायपूरे, सतीश नगराळे,सिद्धार्थ बुरचुडे, शशांक दुर्योधन, चैतन्य खरतड, मनोज खांडेकर, बाळू तितरे,संतोष रत्नपारखी तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळ चंद्रपूर,समावेत ऊर्जानगर वार्डातील ग्रामस्थ उपस्थित होते व झालेल्या विषयाचा निषेध नोंदवीला