गडचांदूर (वि.प्र.)
"गडचांदूरच्या विद्यमान नगरसेवकांना डावलून न.प. उपाध्यक्ष शरद जोगी यांनी म्हणे विकासकामांसाठी घेतली पालकमंत्र्याची भेट!"या मथळ्याखाली साप्ता. चंद्रपूर क्रांती घ्या न्युज पोर्टलवर वास्तव वृत्त प्रकाशित केले होते. वास्तवता असलेल्या हे वृत्त गडचांंदूर न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी यांना इतके झोंबले की त्यांनी चक्क चंद्रपूर क्रांतीचे संपादक संजय कन्नावार यांना भ्रमणध्वनीवरून माझ्याबद्दल काही प्रकाशित कराल तर याद राखा, बरे होणार नाही अशी धमकी देत पत्रकार दोन-तीन हजार रुपयात विकत असतात. तुम्ही फक्त गडचांदूर येऊन दाखवा अशा धमकीवजा शब्दात भ्रमणध्वनीवरून धमकी दिली.
"सत्तेत आहो म्हणून काही बी! करू शकतो," या भ्रमातून शरद जोगी यांनी बाहेर निघावे. पत्रकारांबद्दल चुकीचा समज बाळगणाऱ्या जोगी यांना ही बाब महागात पडेल, यांचे त्यांनी भान ठेवावे. वृत्तपत्रांना अधिकृत जाहिरात देणे म्हणजे पत्रकारांना भिख देणे किंवा खरेदी करणे नसते, हे कुणीतरी सांगा यांना !
वास्तविक पाहता प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा असतात. घडलेल्या चुका दाखविणे, सत्य वृत्त प्रकाशित करणे हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य असते. असेच एक सत्य वृत्त साप्ताहिक चंद्रपूर क्रांतीच्या न्युज पोर्टलने प्रकाशित केले. शरद जोगी हे घटक पक्षाचे नगरसेवक आहेत. गडचांदूर च्या विकास कामाची चर्चा करण्यासाठी ते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांची भेट घेण्यासाठी नागपूरला गेले होते. दिलेल्या माहितीनुसार शरद जोगी यांची ही भेट कोणत्याच विकासकामासाठी नसून खाजगी होती. गडचांदूर च्या विकासाच्या चर्चा करण्याचा उद्देश होता, तर गडचांदूर न.प. मधील सत्तापक्षाचे कोणीही नगरसेवक किंवा पदाधिकारी यावेळी उपस्थित कां नव्हते हाच प्रश्न या वृत्ताच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. गडचांदूर च्या विकासासंदर्भातील ही भेट होती त्यासंदर्भात शरद जोगी यांनी चर्चा झाली असेल तर माध्यमांना सांगायला हवे. तसे न करता चक्क प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी ला धमकावणे ही बाब! जोगी यांच्या उतावळेपणा चा कळस गाठणारी आहे. "सत्तेत आहो म्हणून काही बी! करू शकतो," या भ्रमातून त्यांनी बाहेर निघावे. पत्रकारांबद्दल चुकीचा समज बाळगणाऱ्या जोगी यांना ही बाब महागात पडेल, यांचे त्यांनी भान ठेवावे. वृत्तपत्रांना अधिकृत जाहिरात देणे म्हणजे पत्रकारांना भिख देणे किंवा खरेदी करणे नसते, हे कुणीतरी सांगा यांना !
"सत्तेत आहो म्हणून काही बी! करू शकतो," या भ्रमातून शरद जोगी यांनी बाहेर निघावे. पत्रकारांबद्दल चुकीचा समज बाळगणाऱ्या जोगी यांना ही बाब महागात पडेल, यांचे त्यांनी भान ठेवावे. वृत्तपत्रांना अधिकृत जाहिरात देणे म्हणजे पत्रकारांना भिख देणे किंवा खरेदी करणे नसते, हे कुणीतरी सांगा यांना !