चंद्रपूर:- आज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी देशातील पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे दुचाकी वाहनाला बैलबंडी वर चढवून मोर्चा काढण्यात काढण्यात आले.
देशात सध्या वाढत असलेली महागाई व त्यासोबतच पेट्रोल, डिझेल व गॅस चे दर सुद्धा गगनाला भिडले असल्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोना संकटामुळे लॉकडाऊन मध्ये संकटात सापडलेली सर्वसामान्य जनता या संकटातून अजूनपर्यंत बाहेर आली नाही. आणि त्यातच या सातत्याने वाढ होत असलेल्या महागाई मुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली असून अनेकांना दोन वेळच्या जेवणाची सोय होणे सुद्धा कठीण झालेले आहे.
काँग्रेसच्या काळात पेट्रोल ५०-५५ रुपये प्रतिलिटर किमंत झाली किंवा गॅस सिलेंडर ३०० रुपयांच्या पुढे गेला तरी सध्या प्रधानमंत्री असलेल्या मा. नरेंद्र मोदीं साहेबांच्या याच मंत्रिमंडळात सध्या असलेले अनेक केंद्रीय मंत्री रस्त्यावर उतरून महागाई विरोधात रान पेटवत होते परंतु आता मात्र सत्ता मिळाल्यानंतर महागाई विरोधात चकार शब्द सुद्धा हे केंद्रीय मंत्री काढत नसल्याने सर्वसामान्य जनतेप्रति या सर्व भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांना कळवळाचं राहिला नाही हे सिद्ध होत आहे. सतत दरवाढ होत असताना देखील एकही शब्द केंद्रीय मंत्री बोलत नसुन सत्ता येण्यापूर्वी जनतेला महागाई कमी करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे लॉलीपॉपच दिला होता व म्हणून केंद्र सरकारचा निषेधार्थ आज पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लॉलीपॉप वाटून अभिनव प्रकारे निषेध आंदोलन केले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ व महागाई विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबूब भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात झाले.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष मा. सुनिल भाऊ काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नितीन पिंपलशेंडे, माजी सरपंच अमोल ठाकरे, प्रदेश सचिव गणेश गिरधर, जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, दुर्गापूर ग्रामपंचायत सदस्य निखिल हस्ते, उर्जानगर ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खन्नाडे, विचोडा ग्रा. प. सदस्य अंकित ढेंगारे, जिल्हा सरचिटणीस संदीप बिसेन, सिहल नगराळे, अभिनव देशपांडे, कामगार जिल्हा उपाध्याय संजय सेजुळ, शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, सतीश मांडवकर, तिमोती बंडावार, अक्षय सगदेव, राहुल भगत, आकाश निरटवार, मनोज सोनी, गणेश बावणे, नितीन घुबडे, हेमंत गुंजेकर, रोशन शेख, पवन मेश्राम, केतन जोरगेवार, अतुल साठे, भोजु शर्मा, प्रतीक भांडवलकर, पवन बंडीवार, शुभम आंबोडकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.