चंद्रपूर दि. 28 नोव्हेंबर : राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री, दादाजी भुसे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता मेंढा,ता. सिंदेवाही येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शेतीची पाहणी. सकाळी 10:20 वाजता विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे भेट व पाहणी. सकाळी 11 वाजता तांबेगडी मेंढा, ता. सिंदेवाही येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शेतीची पाहणी. दुपारी 12 वाजता उसेरपार-तुकुम, ता.सावली येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शेतीची पाहणी. दुपारी 12:30 वाजता पालेबारसा, ता. सावली येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शेतीची पाहणी. दुपारी 1:30 वाजता टेकाडी, ता. मूल येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शेतीची पाहणी. दुपारी 1:50 वाजता चिंमडा, ता.मुल येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शेतीची पाहणी.
दुपारी 2:15 वाजता शासकीय विश्रामगृह, मुल येथे आगमन व राखीव. दुपारी 3:15 वाजता नियोजन भवन, चंद्रपुर येथे आगमन व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती परिसराच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.