अबब....वीज निर्मिती केंद्रात ९३९ रकतदानाचा विक्रम




चंद्रपूर :- २९२० मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरजू रुग्ण आणि कोविड रुग्णांसाठी रक्तदानाचा संकल्प करून सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून ह्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे यांच्या निर्देशानुसार तसेच संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) व्ही. थंगपांडियन, संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक(मासं) मानवेंद्र रामटेके आणि चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या कुशल नेतृत्वात रक्तदान शिबीराकरिता संपूर्ण टीम चंद्रपूर सज्ज झाली होती आणि सुमारे ९३९ पिशव्या रक्तदानाचा विक्रम केला. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून चंद्रपूर वीज केंद्रातील २१० मेगावाट, संच क्रमांक ८ व ९, कामगार मनोरंजन केंद्र, चमरी विश्रामगृह आणि स्नेहबंध सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासकिय रक्तपेढी चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती व नागपुर यांनी रक्त संकलन करण्यास भरीव सहकार्य केल्याचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी सांगितले व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून व कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता वर्धापन दिन कमीटीचे सचिव रामेश्वर पुरी, उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर, राजेशकुमार ओस्वाल, किशोर राऊत,विजया बोरकर, प्रभारी उपमुख्य अभियंता मदन अहिरकर, डॉ. संगिता बोदलकर वैद्यकिय अधिक्षक, अधिक्षक अभियंता सुहास जाधव,मिलिंद रामटेके, आर.जे.पुरी, बी.इन.इंगळे, डी.वाय.चौधरी, एम.इन.राजूरकर, अनिल पुनसे, अनिल गंधे, ए.एन.उमरे, पी.एस.रामटेके, पुरुषोत्तम उपासे, सरग,एस.एम.घोडे,पी.एस.नाखले, बाहुबली दोडल महाव्यवस्थापक वित्त व लेखा, ढोमने उप मुख्य अग्निशमन अधिकारी,अरविंद वानखेडे सहा.महाव्यवस्थापक (मासं),कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, व प्रशिक्षण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजकुमार गिमेकर यांनी व इतर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार व सर्व संघटनाचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्था तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, शिकाऊ उमेदवार, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, सी.आय.एस.एफ. कर्मचारी आणि वेकोलीचे क्षेत्र महाव्यवस्थापक साबीर व कर्मचारी यांनी हिरीरीने सहभागी होऊन विक्रमी रक्तदान करण्यात मोलाची भूमिका बजावली.