वाघ हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत व नोकरीच्या मागणीसाठी शिवसेनेचे बंडू हजारे यांचे बेमुदत साखळी उपोषण



चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रमधील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कंत्राटी कामगाराच्या परिवाराला १० लाखाची मदत व घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी तसेच कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेचे शिवसेना नेते बंडू हजारे, कैलास तेलतुंबडे,अमोल मेश्राम हे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी पासून विद्युत केंद्राच्या मेजर गेट समोर बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.


चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघ, बीबट आणि अन्य वन्यप्राणी वास्तव्य करीत असून, दोघांचा मृत्यू झाला. या विरोधात जनमानसात संताप व्यक्त होत आहे.  मंगळवारी 22 फेब्रुवारी रोजी वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चा निघाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन भटारकर यांनी उपोषण आंदोलन केले. दरम्यान, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेटी देवून बैठका घेतल्या. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांना मदत आणि नोकरीचे आश्वासन देण्यात आले नाही.
       कंत्राटी कामगार भोजराज मेश्र।म याच्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा परिवार फार मोठ नुकसान झाल्याने त्याची नुकसान भरपाई म्हणून cstps 10 लाख रुपये दयावे व घरचा एका मुलाला सरकारी नोकरी द्यावी ,लोकेश सोनकुसरे याचा मृत्यू आडोरे,राव या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा मुळे मृत्यू झाला त्यामुळे यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, कुणाल एंटरप्राइजेसने गेल्या  5 वर्षपासून कधीही वेळेवर पगार केला नाही त्यामुळे या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे,sk इंजिनिअरिंग 8 वर्षपासून कामगारांना अन्याय करीत आहे महिन्याचा 8  9 दिवस काम देत आहे.उर्वरीत दिवसाचे रक्कम कंपनी हडप करीत आहे या व इतर मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.