भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शनिवारी हल्ला झाला होता. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्य़ाचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत.आता या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही समावेश आहे. किरीट सोमय्या हे शनिवारी पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत निवेदन देण्यासाठी शिवसैनिक उपस्थित होते. पण किरीट सोमय्या यांनी हे निवेदन घेतले नाही म्हणून शिवसैनिकांचा संताप झाला आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला, असा आरोप होतो आहे.
या हल्ल्याच्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या हे महापालिकेच्या पायऱ्यांवरुन खाली पडताना दिसस आहेत. या घटनेते किरीट सोमय्या यांच्या हाताला दुखापत झाली आहे. किरीट सोमय्या यांनी शनिवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मित्राचा मोठा कोवीड सेंटर घोटाळा उघड करणार असल्याचा दावा केला होता. तसेच यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी असल्याचा आरोप केला होता. पुण्यातील कोवीड सेंटर घोटाळा असल्याचा आरोप करत त्यात संजय राऊतांचा मित्र आणि पार्टनर सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याच दिवशी संध्याकाळी किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याने शिवसेनेवर आणि राज्य सरकावरही जोरदार टीका झाली होती. शिवसेना सत्तेत असूनही शिवसैनिकांनी कायदा हातात घेतल्याने सर्वत्र टीका होत होती. अखेर हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.