वनविभागाने घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांच्या आंदोलनाचा धसका!



वन विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे कामगार व सर्वसामान्यांचे जिव जात असल्याने वनविभागाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला ‌त्यामुळे आमरण उपोषणाचा धसका घेत वनविभागाने तात्काळ चंद्रपूर स्तरावर *"Standard Operating Procedure"* (मानक कार्यपद्धती) समिति गठीत केली.
व त्या नरभक्षक वाघांना आज घेण्यात आलेल्या बैठकीत या परिसरातील तीन वाघ पकडण्याची परवानगी करीता मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, महाराष्ट्र राज्य, नागपूर, यांचे कडे प्रस्ताव पाठविन्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही कालावधी पूर्वी हिराई अतिथीगृह जवळ दुचाकीस्वार कामगारांवर हल्ला केला होता त्यात तो कामगार थोडक्यात बचावला होता मात्र गंभीर जखमी झाला होता.


त्यापूर्वी उर्जानगर वसाहतीत ऑगस्ट २०२० ला ५ वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून मा. मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त यांना प्रत्यक्ष भेटून सतत पत्रव्यवहार करण्यात आला होता.