वीज केंद्राने मनपात भरला 4 कोटी 86 लाखांचा मालमत्ता कर



चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मालमत्ता कर लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार 31 मार्च रोजी वीज केंद्र व्यवस्थापणाने 4 कोटी 86 लाख रुपये कर भरणा केला.


महाऔष्णिक वीज केंद्रातील 500 मेगावॅटचे संच क्रमांक 8 व 9 हे महानगरपलिका हद्दीत येतात. त्यामुळे
सामाजिक दायित्वाचा निधी वीज केंद्राने द्यावे मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. मनपाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने मुद्दा उचलून धरला होता. त्यानुसार महानगरपालिकेने 2016 ते 2022 पर्यंत 29 कोटी 15 लाख 58 हजार रुपयांच्या मालमत्ता कराची नोटीस देण्यात आली. आज आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी 31 मार्च रोजी 4 कोटी 86 लाखांचा कर जमा केला आहे.