झाडीपट्टीतील लेखकांच्या साहित्याची नोंद घेण्यासाठी ग्रंथाचे कार्य सुरू आहे. तरी झाडीपट्टीतील लेखकांनी २०१२ नंतर प्रकाशित झालेल्या साहित्याची एक प्रत साहित्य संमेलनाला येतानी घेऊन यावी.व नोंद घेण्यासाठी जमा करावी. जेणेकरून त्या साहित्याची नोंद झाडीबोली साहित्य ग्रंथात केली जाईल. आपल्या परिसरातील इतर लेखक साहित्यिकांना या याबाबतची माहिती द्यावी. किंवा त्यांच्या साहित्याची एक प्रत २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन जानसुर्ला तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथे येतानी घेऊन यावी. ही बातमी इतर ग्रुप ला कळवावी व इतरांनी सांगावी. जेणेकरून कोणत्याही साहित्यकाचे साहित्य ग्रंथ नोंदीपासून वंचित राहणार नाही. आणलेल्या साहित्याचीच नोंद घेतली जाणार आहे.
तरी झाडीपट्टतील लेखकांनी २०१२ नंतर प्रकाशित आपले व इतरांचे साहित्य १२ व १३ मार्च ला होत असलेल्या २९ व्या साहित्य संमेलनात आणण्याचे आव्हान झाडीबोली संशोधन महर्षी मा. हरिश्चंद्रजी बोरकर यांनी केले आहे.
यानंतर आलेल्या साहित्याची नोंद घेतली जाणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.