दुर्गापूर परिसरात समता नगर परिसरात यामध्ये आज नऊ वाजेच्या दरम्यान लहान बालक खेळत असताना बिबट्याने बाळाला उचलून घेऊन गेले. बाळाचे नाव प्रतीक शेषराव बावणे वय आठ वर्षे असे नाव आहे.ते बेलोरा तालुका भद्रावती येथील रहिवासी आहेत.मुलाचे आईचे वडील आज सकाळी मृत्यु पावले त्यामुळे सर्व कुंटूब तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले.
मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते.तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता.तितक्यात बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले.प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली.मात्र त्या बालकाचे बिबट्याने लचके तोडले.त्या बालकांचे वेगवेगळ्या अवयव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे.