मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यात आकाशातून काही अवशेष काल सिन्देवाही तालुक्यातील गडबोरी येथे ८ते १० फुट लांबीचे गोल रींग पडली होती.यावेळी मोठी जिवीतहानी टळली.त्यानतर नागरीकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते.त्यानंतर सकाळी पुन्हा पवनपार जवळ १ ते २ किलो दरम्यानचे गोल असे मोठ्या फुग्याच्या आकाराचे अवशेष गावातील युवकांना दिसले.त्यांनतर गावातील प्रतीष्टीत नागरीकांना बोलावून त्यांनी तहसिल कार्यालयात ती अवशेष जमा केले आहे. चंद्रपूर विदर्भ मराठवाडा सह अनेक ठिकाणी उल्कापात सारखे दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पडले मिश्रीत धातुचे वस्तू ही सध्या चर्चेचा विषय ठरले असून अनेक खगोलशास्त्र तज्ञांनी यावेळी भेट दिली. यावेळी शास्रज्ञाच्या मते ते अवशेष न्युझीलंडनी पाठविले यानाचे असल्याचे अंदाज यावेळी व्यक्त केला