लहानग्या युगचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, परीसरात शोककळा



मुल: - घरी खेळत असतांना अचानक कुलरला हात लागल्याने विजेचा धक्का लागुन साडेपाच वर्षीय बालकाचा करूण अंत झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

येथील माॅ ट्र्ँव्हल्सचे संचालक तथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे पदाधिकारी महेश जेंगठे येथील वार्ड नं. 17 मधील संत गजानन महाराज मंदिर परिसरात कुटुंबासह राहतात. महेश हयांचा साडे पाच वर्षीय लहान मुलगा युग महेश जेंगठे नेहमी प्रमाणे घराचे अंगणात मोठा भाऊ प्रेम आणि इतर मुलांसोबत सकाळी ११.३० वा. दरम्यान खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याचा हात घरी लावलेल्या चालु कुलरला लागल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की युगचा जागीच करूण अंत झाला. दरम्यान त्याला तातडीने मुल येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकिय उपचारा करीता नेण्यांत आले. परंतु डाॅक्टरांनी मृत पावल्याचे सांगीतले. युग हा सेंट अँन्स हायस्कुल के.जी. चा दुस-या वर्गाचा विद्यार्थी होता. उन्हाळयाच्या सुट्टयामध्यें तो मागील महिण्याभरापासून घरीच राहत होता. विजेच्या धक्याने चिमुकल्या युगचा मृत्यु झाल्याचे समजताच परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.