दुर्गापूर परिसरातील समता नगर परिसरात 30 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान लहान बालक खेळत असताना बिबट्याने प्रतीक शेषराव बावणे (वय आठ) उचलून घेऊन नेले होते.त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी, वकोलीच्या परीसरासरात वाढलेले जंगल साफसफाई करण्यासाठी इंटक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी दुर्गापूर उपक्षेत्र महाप्रबंधक अरुण लाखे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.यावेळी सर्व मागण्या मान्य करत बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्यानंतर वनविभागाच्या पथकाने आज पहाटे सुमारास त्या बिबट्याला पकडण्यात यश मिळविले आहे.