उद्या राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठक




नागपूर : जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उद्या १० एप्रिल २०२२ रोजी, रविवार ला दुपारी १ वाजता टिळक पत्रकार भवन धंतोली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तर्फे आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.
या आढावा बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष मा.आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीती लाभणार आहे. या आढावा बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे, नागपूरचे प्रा. रमेश पिसे,इंजिनियर सुषमाताई भड, अरुण गाडे, बलदेव आडे यांची उपस्थिती राहणार आहे. या आढावा बैठकीसाठी नागपूरजिल्ह्यातील कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन राजेंद्र पाटील, दत्ता मेश्राम यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.