बिबट्याचा पुन्हा बालीकेवर हल्ला




दुर्गापूर-चंद्रपुर येथील 8 वर्षीय आरक्षा जगजिवन कोपुलवार या  बालीकेला बिबट्याने आपले भक्ष्य करण्यासाठी उचलले,पण स्थानिकांच्या सातर्कते मूळे आरक्षा बचावली.
ही घटना दुर्गापूर वार्ड क्र.येथे रात्री 9 च्या सुमारास घडली.या घटनेमुळे पुन्हा एकदा दुर्गापूरात भीती पसरली आहे.जखमी बालीकेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यापूर्वी याच परीसरात एका 8 वर्षीय बालकाला फरफटत जंगलात नेऊन बिबटने ठार केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.बिबटला जेरबंद करा ही मागणी जोर धरत असतांना मंगळवारी रात्री पुन्हा दुर्गापूर परीसरातील वार्ड क्रं.01 येथील बालकाला बिबट्याने जखमी केल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याने त्या बालीकेला पकडल्यानंतर नागरीकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली.आरक्षाला उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.