नागपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचे बुधवार दि. 22 जून 22ला बैठक



     विदर्भातील राष्ट्रीय समाज पक्षाची  पक्ष बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने बुधवार दिनांक 22 जून 22 रोजी सायं. 4:00 वा.  " पिसे निवास " महालगी नगर चौक, रिंग रोड,  एच.पी. पेट्रोल पंप समोर  नागपूर येथे ओबीसी नेते प्रा. रमेश पिसे  यांच्या अध्यक्षतेत विशेष सर्वसाधारण  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती  राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांनी दिली.  या बैठकीत प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन करण्याकरीता  माजी नागपुर जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे,  प्रा. सुधीर सुर्वे,  डॉ. अनंत नासनूरकर,  निलेश चांडक,  प्रा. बलदेव आडे.   ज्येष्ठ  ओबीसी नेते हरिकिशनजी  हटवार, ऍड दीप्ती सुरेश सुर्वे,   चंद्रपूर जिल्हा प्रभारी संजय  कन्नमवार, नागपूर  जिल्हा प्रभारी दत्‍ता मेश्राम,  वाडी शहराध्यक्ष संजय मेश्राम, ऍड वासुदेव वासे, अनिलकुमार ठवरे, पुरुषोत्तम कामडी, प्रेम महेशकर, मंगलमूर्ती सोनकुसरे, फुलसार सतीबावाने, विजय दुरातकर, अश्रफभाई आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार  आहेत.   


  पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ  पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार  पुढील  विषयावर  सखोल  चर्चा करून ठोस निर्णय( ॲक्शन प्लॅन) घेण्यात येणार आहेत. (1) विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने राष्ट्रीय समाज पक्षाची रणनीती ठरणार असून   ठोस कृतीकार्यक्रम  राबविण्यात येणार आहे. (2)   राष्ट्रीय समाज पक्षात नव्याने प्रवेश करू इच्छिणार्‍या पदाधिकाऱ्यांचा  जाहीर पक्ष प्रवेश करून  प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मान करणे. (3)  विदर्भ कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी, शाखा कार्यकारिणी गठित करून बूथ  बांधणी मजबूत करणेबाबत चर्चा करणे.( 4)  राष्ट्रीय समाज कर्मचारी वेल्फेअर आघाडी,युवक आघाडी, असंघटित कामगार आघाडी, वाहतूक आघाडी, शेतकरी आघाडी,  विधी आघाडी, आदी सर्व आघाडयाची बांधणी मजबूत करणे (5) संविधानात्मक आरक्षण आणि धोरणात्मक आरक्षणाची  प्रभावीपणे अंमलबजावणी करणे(6)  महिला सशक्तिकरण  आणि महिला आघाडीची राजकीय फळी  मजबूत करणे.(7) राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबई केंद्रीय कार्यालयाकडे 1000 /-रुपये ऑनलाइन सक्रिय  सदस्य नोंदणी फी जमा करून सक्रिय सदस्यता अभियान प्रभावीपणे राबविणे   (8) पक्षाच्या विचारधारेचा प्रचार- प्रसार करण्याकरीता प्रशिक्षण  कार्यशाळेचे आयोजन करून  प्रशिक्षित कार्यकर्ता तयार करणे. (9)   विदर्भ जनसंपर्क कार्यालयाचे  उद्घाटन करणे(10) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव आणि  छत्रपती राजश्री शाहू महाराज जन्मोत्सव   कार्यक्रमाचे औचित्य साधून                    "     विदर्भस्तरीय आरक्षण हक्क परिषद ' " चे  आयोजन करणे. (11)   *ओबीसीचे राजकीय आरक्षण संरक्षित करणेकरीता "  राजधानी दिल्लीतील  संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर "  आदरणीय राष्ट्रनायक मा. आ.महादेव जानकर साहेब  यांच्या नेतृत्वात  देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  त्या  मोर्चाच्या समर्थनात नागपुरातील संविधान चौकात  नारे निदर्शने करून जाहीर  समर्थन करणे.(12) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि विदर्भातील स्थानिक मूलभूत समस्या वर चर्चा करून हा विषय राष्ट्रीय समाज पक्षाच्या अजेंड्यावर घेण्यासाठी पक्षाच्या  प्रदेश कमिटीकडे अहवाल सादर करणे.     (13) सुशिक्षित बेरोजगार,  अल्पभूधारक  शेतकरी, शेतमुजरा करीता    लघुउद्योग व स्वयंरोजगार निर्मिती केंद्र तयार करणे(.14)   हमाल माथाडी कामगार, असंघटित कामगार, महिला बचत गट, छोटे व्यापारी, व्यवसायिक  यांचेकरीता अर्थसाह्य आणि बँक कर्ज मंजुरी  करणेकरीता  कार्यशाळेचे  आयोजन करणे.(15)  शासन स्तरावरील विविध योजना  सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणयाकरिता   अभ्यासू लोकांची फळी  तयार करणे.((16)  राष्ट्रीय समाज पक्ष आणि विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जन उपयोगी लोक हितार्थ आरोग्य शिबीर, कृषी मेळावे, विदयार्थी  करियर  मार्गदर्शन मिळावे ,  उद्योग व्यवसाय प्रशिक्षण शिबिर , मोफत कायदेशीर सल्ला केंद्र शिबिर आदीचे आयोजन करणे.      (17) राजकीय महत्वकांक्षा जनजागृती अभियान राबवून  उपेक्षित /  वंचित  तरुणांमध्ये राजकीय अस्मिता निर्माण करणे . तरुणांना  राजकीय निर्णय  प्रक्रियेच्या प्रवाहात आणणे .                                    वरील सर्व प्रमुख विषयाच्या अनुषंगाने  सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहेत तरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांनी केले आहे.