चंद्रपूर:- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले.
सदर योजना ही निव्वळ धूळफेक करणारी असून, वाढलेल्या बेरोजगारी वर पांघरून घालण्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात सैन्य भरती रखडली गेली असल्यामुळे सैन्य भरती करिता सराव करणाऱ्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा होती.
सन २०१४ च्या निवडणुकांवेळी मोदी सरकारने दरवर्षी २ करोड रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु २ कोटी सोडून २ लाख ही तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यानंतर आत्ताच काही महिन्यांपूर्वी १ वर्षात १० लाख रोजगार देणार असल्याचे मा. पंतप्रधान यांनी जाहीर केले होते. अश्या धूळफेक करणाऱ्या घोषणा करून एकप्रकारे बेरोजगारांची थट्टा चालविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.
अग्निपथ ही योजना अमलात आणून तरुणांच्या भविष्याशी केंद्र सरकार खेळत आहे. फक्त ४ वर्षे सैन्यदलात सेवा करण्याची संधी देऊन पुन्हा बेरोजगारांच्या खाईत त्या युवकाला केंद्र सरकार ढकलणार आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जे ७५ टक्के तरुण युवक समाजात वावरणार आहे ते सुद्धा एकप्रकारे समाजाकरिता धोकादायकच ठरू शकते.
तसेच या योजनेत ४ वर्षांच्या सेवा कालावधी नंतर शाश्वत रोजगाराचे कुठलेही ठोस पाऊल केंद्र सरकार उचलणार नसल्याने यातून बाहेर पडल्यानंतर बेरोजगारीच्या विळख्यात तरुणाई पुन्हा एकदा अडकेल ही भीती यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी व्यक्त केली.
सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने सदर योजना मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलना दरम्यान केली आहे.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, शहर अध्यक्ष कोमील मडावी, पंचायत समिती सदस्य पंकज धेंगारे, गुड्डू भैय्या खान, आकाश निरटवार, रोशन फुलझेले, तीमोटी बंडावार, अभिजित खंनाडे, संदीप बिसेण,
सौरभ घोरपडे, सिहल नगराळे, शुभम आंबोडकर, राहुल वाघ, चेतन अनंतवार, चिंटू जुनघरे, माजी उपसरपंच असिफ पठाण, राहुल भगत, बिट्टू ढोरके, विष्णू अनंतवार, अनिल कुंभारे, नितीन घुबडे, सचिन मांदाळे, गणेश बावणे, संजय सेजुळ, केतन जोरगेवार, राजुरा तालुकाध्यक्ष असिफ सय्यद, कोरपना तालुकाध्यक्ष सुहेल अली, मंगेश तिखट, बलारशा शहराध्यक्ष रोहन जमगाडे, नंदू मोंढे, गणेश तामटकर, मनोज मंगाम, भिमप्रंकाश उराडे, रहीम खान, देवा धामनगे, पंकज मेंढे, मनोज सोनी, राजू रेड्डी, मनोज गेडाम, शिवराज पाटील, मंगेश वैद्य, अंकित लाडे, अरविंद लोधी, रतन मंडल, राजकुमार खोब्रागडे, हर्षल कांबळे, कुणाल पुल्लीवार, व्यंकटेश बल्लम, ताहीर हुसेन, आशिष गर्ग, गजानन सावळे, सुरजित सिंह बावरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!