कोणताही पक्ष एका जातीवर व समुहावर चालत नाही म्हणून जानकर साहेबांनी उपेक्षित शोषित बहुजन समाजातील घटकाला एकत्र करून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली.
*काही जण सोडून गेलेल्या ची कारणे ..
का तर जानकर साहेब त्यांना पैसे,कारखाने,काही लाभाची पदे,बंगला गाडी माडी ,व ऐशोआराम मिळवुन देत नाहीत स्वत साधे राहतात त्यामुळे कार्यकर्त्यांना पण तसेच राहावे लागते शिवाय रस्त्यावर जेवण करावे लागते कोठेही झोपायला लागते.
अन महत्वाचे म्हणजे जानकर साहेब दुसर्या नेत्यांन सारखे स्वतः ची , नातेवाईकांची, बगल बच्चे यांची घर भरण्यासाठी भ्रष्टाचार , लबाडी करत नाहीत. फक्त एका मतदारसंघात काम करत नाहित.कारण त्यांना संपूर्ण बहुजन समाज ताट मानेने उभा करायचा आहे.
राहिला प्रश्न सोडून जाणाऱ्या मोठय़ा नेत्यांचा एक तर त्याना स्वतःच्या गावातील माणसे ओळखत नव्हते त्याना साहेबांनी राजकारण शिकवले त्यातला एक पण कधी ग्रामपंचायत सदस्य झाला नाही त्याना साहेबांनी महाराष्ट्राचे नेते केले.हिच साहेबांची चुक झाली कारण ह्यामुळे सोडून गेलेल्या लबाडांची महत्त्वाकांक्षा वाढली कारण त्यांना माहीत आहे जानकर साहेब संघर्ष करतय अन फळ मात्र दुसऱ्या पक्षात काम करणार्या समाजाच्या नेत्यांना मिळतय.मग आपण दुसरी कडे जाऊया.
उदा.1. एप्रिल 2014 जानकर साहेब बारामतीत महायुतीतून लढले. पण भाजप शिवसेने सोबत जाण्यापूर्वी मोदी मुंडे फडणवीस ठाकरे यांच्या कडून धनगर समाज ला आरक्षण देतो असे तोंडी व लेखी घेतले अन मग बारमतीतील किमया माहितच असेल .परिणामी काँग्रेस राष्ट्रवादी ला सपाटून मार खावा लागला याचाच अर्थ असा कि जानकर साहेबांना रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने समाजातील दोन राम (रामभाऊ वडकुते, रामहारी रुपनवर )यांना जुन 2014 विधानपरिषद वर आमदार केले .
उदा.2 जसी काँग्रेस राष्ट्रवादीला भिती तिच भिती भाजप ला पडली अन या समाजातील एखादा नेता आपल्याकडे पण पाहिजे म्हणजे जानकर साहेबांच्या मागे लागायची गरज पडायची नाय म्हणून त्यांनी तिसऱ्या रामाला राज्यमंत्री केले.अन जानकर साहेबाला कॅबिनेट देताना आपला राम बारका होऊ नाय म्हणून ह्यानी आपल्या रामाला कॅबिनेट दिली ति पण जानकर यांना शह देण्यासाठी.*
उदा.3.जानकर साहेबांना मंत्री करायच्या आगोदर राज्यसभेत खासदार व्हा असे दानवे भर सभेत म्हणले होते पण जानकरांनी ही खासदारकी न स्वीकारल्यानंतर ती विकास महात्मे ला मिळाली.अन हि बातमी 31 मे 2016 लोकसत्ता पेपरात फ्रंट पेज वर आलती.बातमी अशी आलती की ... "जानकरांना शह देण्यासाठी भाजप कडून महात्मेंना खासदारकी."*
भाजप एवढा जानकरांना शह का देतय कारण रासप भाजप मध्ये विलीन करा अन भाजप मधूनच धनगर समाजाचे नेतृत्व करा तुम्हाला गृहमंत्री करतो.अशी आॅफर भाजपने जानकर साहेबांना दिली होती पण जानकरांनी त्याना सागितले की माझी छोटी का होईना झोपडी हाय तिचा मालक महादेव जानकर हाय . हा पण खुलासा रावसाहेब दानवे यांनी 31 मे च्या मुंबईतील जयंती सभेत केलाय. आता सांगा जर जानकरांनी असे केले आसते तर जानकर गृहमंत्री झाले आसते पण हेच त्यानी न स्वीकारल्यामुळे राम शिंदेंना ग्रह राज्यमंत्री व महात्मे ला खासदार की मिळाली. नंतर असे काय काम केले म्हणून राम शिंदे ला एकट्यालाच बढती देऊन कॅबिनेट मंत्री केले कारण जानकरांना कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून परत एवढीच ताकद रामाला दिली . कारण जानकरांचे वादळ.*
उदा.4.बारामतीतुन 2019 ची लोकसभा लढवणार असे जानेवारी 2017 मध्ये जानकरांनी जाहीर केल्यानंतर लगेचच मार्च 2017 ला नाना देवकते पाटील यांना पुणे जिल्ह्या परिषदेत अध्यक्ष करण्यात आले.* ....यालाच म्हणतात जानकरांच्या रासप ची क्रांती.
जानकर साहेबांच्या 27 वर्ष त्यागाची फळे खातात दुसर्या पक्षातील समाजाचे नेते.हे विसरून चालणार नाही. ह्या आगोदर का नाही मिळाली राज्यसभ, विधानपरिषद, दोन दोन कॅबिनेट मंत्री, दोन जिल्हा परिषद अध्यक्ष(देवकते, सोनवलकर) याचा जरा विचार करा अन जानकर साहेबांचा रासप पक्ष हा प्रस्थापित पक्षांसाठी दबाव गट बनलाय म्हणून त्या पक्षात अलिकडे समाजातील नेत्यांना स्थान आहे. याचा जरा विचार करा अन रासप व जानकर साहेबांना खडे हाणू नका. जानकर हाय म्हणून तुम्ही ज्या त्या पक्षात सुखी हाय नाहितर पाठीमागचे दिवस आठवा.
म्हणून जिथे कुठे आसाल तिथे सुखी राहायचे असेल तर महादेव जानकर साहेबांचे नेतृत्त्व मान्य करावेच लागेल..
लेखक -
संजय वलेकर सर
रासप प्रवक्ते माळशिरस