राष्ट्रीय समाज पक्षाच्या संसदेवरील ऐतिहासिक भव्य मोर्चात कार्यकर्त्यांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा प्रा. ऍड. रमेश पिसे



ओबीसीसह वंचित घटकाची जातिनिहाय जनगणना त्वरित करा. मंडल आयोगाची पूर्णतः अंमलबजावणी करा. खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू करा.या प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडून मंजूर करण्याकरीता राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक मा.आ. महादेव जानकर साहेब यांचे खंबीर नेतृत्वात  राजधानी दिल्लीत शुक्रवार दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:00 वा. जंतर - मंतर नव्वी दिल्ली येथून संसद भवनावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने वंचित, उपेक्षितांसाठी  ऐतिहासिक देशव्यपी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.तरी या मोर्च्यात विदर्भातील कार्यकर्त्यानी मोठया संख्येने सहभागी व्हावे.असे अवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.ऍड.रमेश पिसे यांनी नागपूरात  संपन्न झालेल्या  विदर्भस्तरीय आढावा बैठकीत केले.

सक्रीय सभासद नोंदणी 

 यावेळी ऍड वसुदेव वासे, पुरुषोत्तम कामडी, डॉ. अनंत नासनूरकर,डॉ. ज्ञानेश्वर वघरे, डॉ. दादाराव इंगळे,दत्ता मेश्राम, संजय मेश्राम, हर्षल काळे,  दिवसे साहेब यवतमाळ, अक्षय सुभाषराव कात्रे अमरावती यांनी राष्ट्रीय  समाज पक्षाचे ऑन लाईन सक्रिय सदस्य नोंदणी फी प्रत्येकी 1000/-रूपये प्रमाणे एकूण 11000/(अक्षरी- अकरा हजार रूपये ) रोख राशी  केंद्रीय कार्यालय मुंबई यांचे बँक खातेत  जमा करून सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. याबद्दल  राष्ट्रीय  समाज पक्षाच्या केंद्रीयकार्यकारणी  व प्रदेश कार्यकारीणी आणि विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने विदर्भ   संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले.

नशामुक्त अभियानाची सुरुवात

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कायदे विषयक मार्गदर्शन केंद्राचे आणि   स्वस्थ,  समृद्ध व नशामुक्त भारत अभियानाचे उपस्थितांचे हस्ते उदघाटनही करण्यात आले.  या सभेला विदर्भातील.उमेश कोरराम,, सुशील शेंडे , .वसंत गुजर,विकास तायडे,  ऍड सुनील लांजेवार,अशोक माळोदे, आर. दिवसे,  विलास कडबे,  शरद कपाटे,हर्षद काळे,भास्कर गावंडे, चव्हाण   आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहर कार्यकारिणी गठित

 त्याचप्रमाणे  राष्ट्रीय समाज पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर  यांच्या आदेशानुसार नागपूर शहर कार्यकारणीचे सरचिटणीस पदी डॉ.प्रशांत वसंतराव शिंगाडे ,  नागपूर शहर सचिव पदी देविदास शामराव आगरकर,नागपूर शहर सहसचिव पदी  सुनील नामदेवराव शेंडे, नागपूर शहर उपाध्यक्ष पदी डॉ.अरुण कंठीरामजी चुरड व पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र  संघटक पदी डॉ. दादाराव खुशालराव  इंगळे तर दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी डॉ.ज्ञानेश्वर विठ्ठलराव  वघरे  यांना नियुक्तीपत्र देऊन व रासपचा  दुपट्टा गळ्यात टाकून  सन्मानित करण्यात आले.