चंद्रपूर, दि.
8 जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव तुकुम तालुका भद्रावती येथे ऊर्जा फाउंडेशन चंद्रपुर च्या वतीने गरीब व होतकरु 70 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्कूल बैग चे वितरन करण्यात आले. चंद्रपुर जिल्ह्यातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर विद्यार्थी केंद्रबिंदु मानूंन स्पर्धापरिक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कार्यशाला घेणारे, मध्यममिक विद्यार्थ्यां साठी शालेय साहित्य वाटप व सेमिनार घेण्यात ऊर्जा फाउंडेशन चंद्रपुर पुढे असते.कोरोना व रक्तदान चळवळीत अग्रेसर ऊर्जा फाऊंडेशन चे अभियंते राजकुमार गिमेकर यांचा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा झाला होता. त्यांनीच घडवून आणलेल्या कार्यक्रमाकरीता इंजी. पारस कांबळे सचिव, ऊर्जा फाउंडेशन, सल्लागार इंजी. मोहन वैद्य ऊर्जा फाउंडेशन, सदस्य जगदेव सपकाळ, इंजी. सुशील ठावरी CSTPS, इंजी. बाळासाहेब तिड़के, सचिन गौरकार, पंकज लभाने,मंगेश कोहाडे,प्रथमेष बराहनपुरे,संदीप दडमल,अभय मस्के, नरेंद्र रहाटे, अभिजीत जीवने, शरद नंनावरे ऊर्जा फाउंडेशन चंद्रपुर तसेच प्रमुख पाहुणे सौ भावना कुरेकार, सरपंच, सौ नीलिमा कुरेकार, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,श्री विनोद मडावी उपसरपंच, सौ भाग्यश्री डाखोरे, सारिका भुसारी,माधुरी टोंगे, बालाजी घोडमारे शा. व्य. स. सदस्य, श्री गुलाबराव भडके, अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ ,श्री योगेश्वर कुरेकार सचिव गुरुदेव सेवा मंडळ प्रास्ताविक गजानन घुमे, मुख्याध्यापक यांनी तर
संचालन कु.मीनाक्षी बलकी, शिक्षिका आणि आभारप्रदर्शन महेश सोरते, शिक्षक यांनी केले.